पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साळी, सुतार, कुंभार लोहार, चांभार सर्वांनी आपआपली हत्यारे टाकून नांगराकडे धांव मारली; आणि शेतकीच्या धंद्याचे क्षेत्रांत गर्दी उडून या बिचाऱ्यांवर अन्नावांचून मरण्याची पाळी आली. असो. आमच्या लोकांचे लक्ष्य आतां सृष्टशक्तीच्या उपयोगाने पक्का माल बनविण्याकडे लागण्याची चिन्हें दिसू लागली आहेत. इ. स. १८५१ साली मुंबईस पहिली कापडाची गिरणी " रणछोडलाल छोटालाल" यांच्या प्रयत्नाने स्थापन झाली. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या देशांत कापडांच्या गिरण्यांची संख्या सुमारे दीडशे झाली आहे. याशिवाय सर्व देशभर तागाच्या, रेशमाच्या, लोकरीच्या, कागदाच्या वगैरे बऱ्याच गिरण्या निघाल्या असून शिवाय कातडी कमाविण्याचे, दारू गाळण्याचे, साबण करण्याचे, दोऱ्यांचे, साखरेचे, पिठाचे, हाडेंचुरण्याचे, तेल काढण्याचे, चिरुट करण्याचे, लोखंडी व पितळी सामानाचे, कुंभार कामाचे वगैरे लहान लहान कारखाने बरेच अस्ति. त्वांत येत आहेत; तथापि या कारखान्यांत बरेच युरोपियन भांडवल असल्यामुळे त्यां पैकी फारच थोड्यांच्या शिवाय आझी बहुतेक मजुरीचेच धनी आहोत. आणि अद्यापि परकीदेशांचा माल दरसाल जवळ जवळ एक अब्ज रुपयांचा आपल्या देशांत खपत आहे. या गोष्टीवरून आमाला या कामी किती प्रयत्न करावयास पाहिजे आहेत हे वाच. कांच्या लक्ष्यांत येईल. पाया बाबतीत सुधारणा करण्याचे काम सरकाराचे आहे. त्यांनी निदान प्रत्येक जिल्ह्यांत एक तरी धंदेशिक्षणाची