पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वून त्यांच्या निरनिराळ्या वस्तू बनवून त्या पाठविल्या पाहिजेत, चिंध्यांच्या ऐवजी कागद धाडिले पाहिजेत. अशी एक की दोन शेकडों उदाहरणे देतां येतील. पक्का माल किंवा ज्याला आपण प्रस्तुत तिसऱ्या कारणांत हस्त कौशल्य आणि यंत्रसाह्य यांच्या योगाने तयार केलेला माल असें झटलें आहे; त्या मालाची बहुतेक मूल. द्रव्ये आपल्या देशांत उत्पन्न होत असून व कांहीं उत्पन्न होण्यासारखी असून आपण ती तशीच परकीय देशांत पाठवितो व त्याचा वरील प्रकारचा बनविलेला माल आपल्या देशांत आणितों या घातक प्रकाराने आपले फार नुकसान होत आहे. आपल्याकडे हस्तकौशल्य चांगले होते; या विषयींची साक्ष रामायणादि प्रथावरून पटेल. अलफाजलच्या ऐनेअकबरी ग्रंथांत या विषयींची बरीच माहिती दिली आहे. आणि पुष्कळ जुन्या ग्रंथांच्या व लेखांच्या आधाराने सर जार्ज वर्डवुड यांनी " हिंदुस्थानांतील कलाकौशल्य" ह्मणून जें एक पुस्तक लिहिले आहे त्यांत व हंटर साहेबांच्या " इंडियनएम्पायर" नामक ग्रथांत या विषयी पुष्कळच माहिती दिली आहे पाश्चिमात्य लोकांनी अग्नि, विद्युत् वगैरे सृष्ट. शक्तिस आपल्या दासी बनविल्यापासून, हिंदुस्थानाच्या पदाथीस आपला बाजार अगदी सक्तीने बद केल्यापासून, कला. कौशल्याच्या जिनसांच्या उपभोक्त्या एतद्देशीय संस्थानिकांचा दलहौसी साहेबांच्या भयंकर जबड्यांत स्वाहाकार झाल्यापासून आणि अमेरिकन लढाईचे प्रसंगी कापसाच्या वगैरे झालेल्या महर्गतेपासून आमच्या बिचान्या कारागिरांनी हात टेकले.