पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किंवा गव्हांची वगैरे शेतें जशी सुकतात किंवा अधिक पडल्याने ती जशी कुजतात तसें लोखंडादि खनिज धातूंचे किंवा दगडी कोळसे वगैरे खनिज द्रव्यांचे होत नाही. आमी जे आज केवळ शेतकरी बनत चाललो आहों त्या आमांला धांवड आणि लोहार बनले पाहिजे. ह्मणजे पहिली दोन कारणे उत्पन्न होऊन पेटलेल्या दुष्काळाग्निच्या ज्वाळां. नी होरपळण्याची पाळी आझांवर येणार नाही. अशा . असो. आमीं खाणीत पडून राहिलेले पदार्थ आपल्या द्रव्याच्या आणि यत्नाच्या बळाने काढून त्यांना अगदी शुद्ध केलें ह्मणजे आमचे कर्तव्य संपलें काय? छे! असें बिलकूल नाही. वास्तविक आपल्या कर्तव्याला येथून आरंभच झाला; असे आपण मानिले पाहिजे. आपणापैकी बरेच शेतकरी धावड आणि लोहार बनले तरी " हिंदुस्थान ह्मणजे केवळ कच्चा माल उत्पन्न करणारें राष्ट्र अशी जी सध्यां आपली अपकिर्ती झाली आहे ती काही कमी होणार नाही. ती कमी करावयाची ह्मणजे आपणांस याच्या वरच्या पायरीवर गेले पाहिजे. आपण पक्का माल उत्पन्न करण्याच्या व तो परदेशी पाठविण्याच्या तजविजीस लागले पाहिजे. जवस भुईमुग, तीळ वगैरे परदेशी पाठवावयाचे सोडून, त्यांची तेलें गाळून ती तिकडे रवाना केली पाहिजेत, रंगाच्या वनस्पती न पाठवितां त्यांचे रंग करून प ठविले पाहिजेत; गव्हा ऐवजी बिस्किटें बनवून ती रवाना केली पाहिजेत; गुळाबद्दल साखर नेली पाहिजे; कापूस, लोंकर, रेशीम, ताग वगैरे बरतूंच्या ऐवजी कापड, शाली, रेशमी व तागी वस्त्रे तिकडे नेली पाहिजेत. नुसती कातडी न पाठवितां ती कमा