पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बनून समाईकीने मोठमोठी कामें शिरावर घेतली पाहिजेत. . तुहीं आतां दुसऱ्याच्या ओंजळीने किती दिवस पाणीपिणार! सर्व जगांतील लोक वायुवेगाने पुढे जात असतां तुमची ही पिपीलिकागती कधी सुटणार ? या काळांत कोणी कोणाला खांद्यावर उचलून पुढे नेणार नाही. ज्याची त्याने आपली मुंडी मोठ्या नेटाने पुढें खुपसली पाहिजे. सरकारच्या मदतीवर तुझी विशेष अवलंबून राहूं नका. V ह्मणजे अवश्य ती मदत त्यांच्याकडून तुह्मांला मिळेल, आपलें सरकार अप्रतिबंध व्यापाराचे उत्तेजक असल्यामुळे येथील धंद्यास उत्तेजन मिळावें ह्मणून ते कधी तुझांला बक्षिस ( Bounty) लावणार नाही. किंवा परक्या देशांतून येथे येणाऱ्या मालावर जकातही बसविणार नाही. सरकारांनी हे धंदे काही दिवस स्वतः चालवावेत आणि ते चांगले फायदेशीर होऊ लागल्यावर फ्रेंच सरकाराप्रमाणे खर्च झालेला पैसा घेऊन खासगी कंपन्यांच्या स्वाधीन करावेत. किंवा लोकांस असल्या धंद्यास पैसे घालण्याचा धीर यावा ह्मणून व्याजाची हमी घेण्यास तयार व्हावें. आणि आगगाडीच्या प्रसाराचे कामी, चहाच्या लागवडीचे संबेधांत व चांगल्या कापसाची लागवड करण्याच्या बाबतीत सरकारनी अशी हमी घेतली आहे. ह्मणून या कामांतही त्यांच्याकडून काही हरकत येईल असें दिसत नाही. अशा रीतीने खाणींत-केवळ जमिनींत-पुरून राहिलेल्या खनिज संपत्तीला आपण बाहेर काढली पाहिजे. ह्या संपत्तीचे पीक कांही पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर अवलंबून नाही. पाऊस न पडला ह्मणजे आमची भाताची