पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतो. सन १८९२ साली वीस लक्ष टन कोळसा या प्रमाणे रवाना झाला. मोती सिंव्हल द्वीपाच्या किनाऱ्यावर सांपडतात. दर साल जवळ जवळ वीस लक्षांची मोती आणि सतरा लक्षांची पोवळी परदेशांतून इकडे येतात. पोवळी आपल्या इकडे कोठे होत नाहीत. । या तिसऱ्या मुद्याविषयी केलेल्या विवरणावरून वाचकांच्या लक्षात येईल की, आजपर्यंत माहिती असलेल्या बहुतेक सर्व प्रकारच्या धातु आणि अत्यंत महत्वाची अशी खनिजद्रव्ये हिंदुस्थानांत तेथे असलेल्या खपापेक्षाही पुष्कळ अधिक प्रमाणाने मिळू शकतील. मात्र त्यांना भूमातेच्या उदरांतून बाहेर काढून स्वच्छ करण्याची मेहनत आह्मी केली पाहिजे; आमचे बापदादे अमका धंदा करीत आले तो टाकून आह्मीं तमका कसा पत्करावा असल्या वेडगळ समजुती आह्मीं टाकून दिल्या पाहिजेत, आणि आझांपैकी ज्यांच्या डोक्यावर लक्ष्मीचें कृपाछत्र झुलत असेल त्यांनी छाती करून आपल्या पिशवीचे बंद ढीले केले पाहिजेत; दागिन्यांच्या चालत्याबोलत्या तावदाना मधून ते या नवीन धंद्यांत खर्ची घातले पाहिजेत आणि आपल्या पुरून ठेवलेल्या हांड्यांतून रुपये काढून ते निरनिराळ्या खाणीत घालण्याचे मनावर धरले पाहिजे. सवाई दिडीची व्याजे घेऊन आपल्याच गरीब गुरीब बंधु जनांच्या माना मुरगळण्याचे सोडून दिले पाहिजे, आपण दुकानदार बनण्यापेक्षां उदमी बनण्याची हांव धरली पाहिजे आणि एकलकोंडेपणाने राहून एकमेकांस पाण्यात पाहण्यापेक्षा एकमेकांचे भागीदार