पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ खाने आहेत, त्यांचे काम व्यवस्थित चालून जर कांच उत्तम रितीने शुद्ध होईल तर जवळ जवळ ऐशी लक्ष रुपयांचे कांच काम आपल्या देशांत येते, तें बंद होऊन आपला पैसा आपल्या देशांत राहील. छोटा नागपूर, बुंदेलखंड हैद. राबाद, गोवळकोंडा वगैरे ठिकाणी हिन्यांच्या खाणी आहेत; परंतु यांत पुष्कळ हिरे सांपडत नाहीत. माणकें, ब्रह्मदेशांतील सुमारे ६६ चौरस मैल प्रदेशांत सांपडतात व ती काढण्याचे काम कंपन्यांकडून चालले आहे. रॉकेलच्या विहिरी ब्रह्मदेश, आसाम व पंजाब प्रांतांत आहेत परंतु त्यातून तेल निघावे तितकें निघत नाहीं; आपल्या देशांत सरासरी आठ लक्ष रुपये किंमतीचे रॉकेल निघते आणि तेच बाहेरून तीन कोटी पेक्षा जास्त किंमतीचे येते. इंग्लंड देशास सुसंपन्न करणारा जो दगडीकोळसा तोही आतां आपल्या देशांत पुष्कळ सांपडूं लागला आहे. इ. स. १८८८ साली सुमारे दोन कोटींचा कोळसा परदेशांतून आपल्याकडे येत असे तो १८९२ साली त्याचा खप अत्यंत झपाट्याने वाढत असतां अवघा सवा कोटीचाच आला, आणि हल्ली तर केवळ ९७९८ लक्षांचाच येतो. आपल्या देशांत १८७१।७६ साली फक्त १० लक्ष टन कोळसा निघत असे तो हल्ली सब्बीस लक्ष टन निघतो. मुंबई, मद्रास, व वायव्येकडील प्रांत हे इलाखे शिवाय करून बाकीच्या बहुतेक इलाख्यांत याच्या खाणी आहेत. यांपैकी काही मोठ्या खाणी मात्र सरकारच्या देखरेखीखाली आहेत व बाकीच्या खासगी कंपन्यांच्या देखरेखीखाली आहेत. आपल्या कोळशाचा बराच भाग परदेशी रवाना