पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तांबें व जस्त घालून पितळ करण्याचे काम बरेच चालतें. दुसऱ्या काही मिश्रधातु आपले कारागीर तयार करितात. कोणी योग्य मार्गदर्शक मिळेल तर जर्मन सिलव्हर सारखी मिश्रणेही ते करू शकतील. हिंदस्थानांतील खनिज द्रव्यांवर रा. बर्वे यांनी एक लहानसें पुस्तक लिहिले असून त्यांत सुरतेनजीकच्या प्रदेशांत सिनोबार, झणजे पाऱ्याची अशोधित धातु सांपडते व त्यास गुजराथी लोक "काचा पारो ह्मणतात " असे लिहिले आहे. हे खनिज धातुसंबंधाने झाले. आता मीठ, सोरा, दगड, कांच, हिरे, माणकें, राकेल व दगडी कोळसे इत्यादि खनिज द्रव्यांसंबंधी विचार करूं. पूर्वी कोणी संस्कृत कवीने "दुर्लभं मानुषं जन्म भारते तत्र दुर्लभम्" असें झटले आहे ते अगदी खरे आहे. आमची अवस्था मात्र कोंबडा आणि रत्न, या गोष्टींतील कोंबड्याप्रमाणे झाली आहे. असो. या खनिज द्रव्यानेही आमची मायभूमी अगदी पूर्ण भरली आहे. हिंदुस्थानांत अजमासे नऊ लक्ष टन मीठ उत्पन्न होतें. व साडेतीन लक्ष टन परदेशांतून येते. फक्त पंजाबांतल्या खाणींत इ० स० १८९३ साली एक लक्ष टनापेक्षा जास्त टन मीठ सांपडले. कृतीने सोरा करण्याचा शोध परदेशांत लागल्यापासून येथील खनिज सोन्याच्या व्यापाराला मंदी आली आहे. हल्ली सुमारे चार पांच लक्ष रुपयांचा सोरा बाहेरदेशी जातो. जेड दगड ब्रह्मदेशांत सांपडतो व त्याचा खप चिनांत होतो. अशुद्ध प्रकारची कांच आपले इकडे गुजराथेत कपडवंज वगैरे ठिकाणी तयार होते. या शिवाय अलवार, बंगाला वगैरे ठिकाणी ही कांच करण्याचे कार