पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ सन १८९२ साली १६३१८८ औंस ह्मणजे जवळ जवळ ९९ लक्ष रुपये किंमतीचें सोने काढिले. परदेशांतून दर वर्षी सुमारे चार कोटी रुपये किंमतीचें सोने हिंदुस्थानांत येते. मैसूर वांचून इतर ठिकाणी झारेकऱ्यांप्रमाणे चाळून कांहीं सोने काढितात, परंतु ते फार थोडे असते. तेथेही जर अशाच उत्तम देखरेखी खाली सुधारलेल्या पद्धतीवर काम चालू होईल, तर देशांतील लोकांस मजूरी मिळून परदेशांत जाणारा पैसा देशांतल्या देशांत राहील. आपल्या देशाची जमीन भूगर्भशास्त्रदृष्टया सर्व धातु सांपडण्यासारखी आहे. परंतु रुपें, कोठे किती सांपडतें, याची माहिती कोठे मिळाली नाही. तथापि सरकारी टांकसाळीत चांदीचे नाणे पाडण्याचे बंद होईपर्यंत येथे दरसाल नऊ कोट रुपयांची चांदी परदेशांतून येत असे. धारवाड, मध्यप्रांत, राजपुताना, काश्मीर वगैरे ठिकाणी पुष्कळ तांबें सांपडते व यूरोपांतून तांबे इकडे येऊन आमच्या या धंद्यास अर्धचंद्र मिळेपर्यंत वरील सर्व ठिकाणी ते पुष्कळ निघत असे. अलीकडे बंगाल इलाख्यांतील हजारीबाग जिल्ह्यांत वरागंडा येथे अशोधित धातुपासून शुद्ध तांबे काढण्याचे प्रयत्न यूरोपियन लोकांनी पुष्कळ चालविले आहेत. इ० स० १८९० साली येथे ३०५ टन तांबे काढले. त्याची किंमत २,३४,००० रु. झाली. दरसाल सुमारे दीड कोटी रुपयांचे तांब्याचे पत्रे आपल्या देशांत येतात. याशिवाय कथील, शिसें, जस्त व, कॅलेमाईन, ब्लेंड, निकल, आलोमिन, म्यांगनीझ वगैरे नवीन धातूही आपले. इकडे पुष्कळ सांपडतात. नाशिक जिल्ह्यांत व इतर ठिकाणी