पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणजे तेथे सरपणाची फार अवश्यकता असते. एक टन लोखंड गाळण्यास सुमारे चौदा टन कोळसा लागतो. परंतु वरील बत्तीस ठिकाणांपैकी सोळा ठिकाणी असा सरपणाचा पुरवठाही आहे. मध्यप्रांतांत चांदा, बंगाल्यांत हजारी बाग, मुंबई इलाख्यांत कच्छ, वायव्य प्रांतांत कुमेआन आणि आसामांत कासिया व जुटियाचे डोंगर येथें निर्भेळ लोखंड विपूल असून कारखान्यास अवश्य लागणाऱ्या जळणाचाही उत्कृष्ठ पुरवठा आहे. असे असूनही यूरोपीयन पद्धतीने लोखंड गाळण्याचे मोठे कारखाने कायते दोनच आहेत. एक बंगाल इलाख्यांत ब्याकूल येथें व दुसरा अंबाल्याजवळ नाहन संस्थानांत आहे. इ. स. १८९३ साली वर दिल्याप्रमाणे अनुकूलावस्थेत अवघे ३७१०२ टन ह्मणजे २३१३७१ रुपयांचे लोखंड हिंदुस्थानांत निघाले. "सांपत्तिक भूगर्भशास्त्र" या पुस्तकाचे कर्ते बॉल साहेब ह्मणतात की "राणीगंज येथे कोणी लोखंडाचा कारखाना काढील तर बंगाल्यांत परदेशी लोखंडाची डाळ शिजणार नाही," व क्याफ्टन हाऊनसेंड यांचे असें मत आहे की, दक्षिण हिंदुस्थानांत सालेम येथे चांगल्या लोखंडाचा कारखाना विशेष फायदेशीर होईल." या गोष्टी लक्षात ठेवण्या सारख्या आहेत. सोने बहुतेक सर्व देशांत सांपडते. आमच्या जवळच्या यादीत ज्या ठिकाणी सोनें सांपडते अशी ठिकाणे सरासरी चाळीस दिली आहेत. पैकी मैसूर, व मद्रास इलाख्यांतील वायनाड या दोन ठिकाणी यूरोपीयन लोकांचे देखरेखीखाली चांगल्या पद्धतशीर रीतीनें सोने काढण्यात येतें, मैसूरांत