पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. सुमारे तीन वर्षांपूर्वी,हिंदुस्थानांतील दुष्काळ, या विषयावर सर्वोत्कृष्ठ निबंध लिहिणारास, निर्णयसागर छापखान्याच्या मालकांकडून एक बक्षीस लावण्यांत आले होते. त्या प्रसंगाचा लाभ घेऊन मी हा निबंध लिहिला, परंतु तो बक्षीस लावणारांनी रेखाटलेल्या मर्यादेपेक्षा थोडा विस्तृत झाला, आणि मुदती पाठीमागून दोन दिवसांनी त्यांच्या हाती गेला; यामुळे तो परीक्षकांच्या नजरे खालून न जातां तसाच माझा मला परत मिळाला. नंतर श्रीशिवजयंत्युत्सवप्रसंगी मी येथील मंडळीपुढे तो वाचून दाखविला. तेव्हां कांहीं सद्गृहस्थांनी व त्यानंतर माझ्या काही विद्वान् मित्रांनी मला तो छापण्याविषयी फार आग्रह केला. ही त्यांची इच्छा राष्ट्रमुखाचे संपादक रा. पालवणकर यांनी तो आपल्या त्रैमासिकाकरितां मजपाशीं मागितल्यामुळेच मला पूर्ण करितां आली. यामुळे मी रा. पालवणकर यांचा फार आभारी आहे. निबंध लिहिल्यापासून आज तीन वर्षात अनेक बाबतींत आमच्या देशाची जी प्रगति किंवा पिच्छेहाट झाली, तिचा उल्लेख, सदर निबंध कांही अडचणीमुळे, छापतेवेळी माझ्या नजरेखालून न गेल्यामुळे मूळ निबंधांत करितां आला नाही, याबद्दल दिलगिरी प्रदर्शित करून, या प्रस्तावनेंत अगदी संक्षिप्तरूपाने करण्याचे योजिले आहे. या अवधीत गुजराथ व देशावरील काही जिल्हे खरीज करून बाकी बहुतेक ठिकाणी पर्जन्यवृष्टि समाधानकारक