पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काय तेथल्या लोकांप्रमाणे अगदीच निष्कांचन झाले ? या प्रश्नांची उत्तरे आपण दिली, झणजे आमच्या तिसऱ्या कारणामुळे येथे पडणारे दुष्काळ काही दिवसांच्या प्रयत्नांनी आपणांस कसे टाळता येतील हे वाचकांस समजेल. प्रथम लोखंड वगरे खनिज धातूंसंबंधानेच विचार करूं. दिल्ली येथे सुमारे १५०० वर्षांपूर्वी उभारलेला एक लोहस्तंभ आहे. तो पाहिला ह्मणजे सांप्रतचे परदेशस्थ कारा. गीर तोंडांत बोटे घालतात आणि ह्मणतात "अशा प्रकारचे लोखंडकाम करण्यासारखे कारखाने आज देखील जगांत फार थोडे सांपडतील.” आसामांतील तोफा आणि शिरहद्दीच्या तरवारी तर सर्व जगांत प्रसिद्ध होत्या आणि विला. यती लोक चाकू. कात्र्या बनविण्यास हिंदुस्थानी पोलाद नेत. परंतु आज ही सर्व स्थिति बदलून गेली आहे. आज य.कश्चित् टांचणी सुईपासून तों तहत गिरण्यांतील मोठमोठाल्या लोखंडी व पोलादी यंत्रांपर्यंत सर्व सामान परदेशांतून आणावे लागते व त्याकरितां दरसाल आमचे नऊ कोट रुपये परदेशास जाऊन, आमच्या धावड, घिसाडी. लोहार वगैरे लोखंडी कामें करणाऱ्या लोकांस आपापला धंदा सोडून शेतीकडे धांव मारावी लागते. FTER प्राचीन काळी हिंदुस्थानच्या जमिनीत लोखंड सांपडत असे; आणि आज त्याचा अगदीच नायनाट झाला काय ? छेः असें मुळीच नाही. आमच्या जवळ असलेल्या माहितीवरून पाहतां हिंदुस्थानांत निरनिराळ्या बत्तीस ठिकाणी विपुल लोखंड सांपडते. परंतु नुसते लोखंड सांपडून उपयोगाचे नाही. लोखंड गाळण्याचा कारखाना काढावयाचा