पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेतकन्यांत अंतर्भाव केला असतां, हे प्रमाण शेकडा पंचायशीच्याही वर जाते. अर्थात् पूर्वीचा व्यापारी हिंदुस्थान देश, आतां बहुतांशी शेतकीवर अवलंबून रहाणारा झाला आहे. अशा लोकांजवळ जर कोणत्याही प्रकारची शिल्लक नसेल, तर त्यांस एका वर्षाच्या अनावृष्टीने उपाशी मरण्याची पाळी आल्यास काही नवल नाही; परंतु ही स्थिति अनिवार्य आहे काय ? हिंदुस्थानांतील लोकांस शेतकीवांचून दुसरा धंदा करण्यास जागाच नाही काय? जो देश शंभर दीडशे वर्षांच्या पूर्वी केवळ सुवर्णभूमि ह्मणून जिकडे तिकड गाजत असे, आज ज्यांच्या राज्यावर सूर्य मावळत नाहीं असे इंग्रज ज्यावेळी अंगाला रंग लावून व कातडी पांघरून रानोमाळ भटकत असत, त्यावेळी ज्या देशांतील डाक्याची मलमल, काश्मीरच्या शाली आणि दिल्लीचा किनखाप, सीझर राजाच्या दरबाराला शोभा आणीत असे, लंडनची जगाला ओळख होण्याचे पूर्वीच जेथली धातूंवर, हस्तिदंतावर आणि शिशाच्या व चंदनाच्या लाकडावर के. लेली नकशीची कामें, जेथली डोळ्यांस दिपविणारी अत्यंत तेजस्वी रत्ने, जेथल्या चित्रविचित्र मखमाली आणि सुबक गालीचे, जेथलें पोलादी काम, मातीची भांडी आणि उत्तम नौका पृथ्वीवर सर्व ठिकाणी नामांकित ठरल्या होत्या, त्या देशांतील शेकडा ऐशी नव्वद लोकांनी एकादा दुष्काळ पडताच कांखाबगला वर करून यमाजीभास्कराच्याच घरची वाट सुधारली पाहिजे काय तेथें उदीमव्यापारांची काहींच सोय नाही काय? तेथल्या जमीनीत कांहींच कां खनिज द्रव्ये नाहीत ? तेथले चतुर्दश रत्ने प्रसवणारे समुद्र, आज