पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हजार आहे. इंग्रजी मुलखाप्रमाणेच येथेही अवर्षण होऊन दुष्काळ पडला आहे. परंतु तेथल्या हिंदुराजास आपली प्रजा सुखासमाधानांत असण्यांत मोठा अभिमान वाटत असल्यामुळे ती या दुष्काळांतही मोठ्या आनंदांत आहे." याच्या उलट चौथें उदाहरण आमच्या सुधारलेल्या इंग्रजबहाद्दराच्या अमलांतील मद्रास इलाख्याचे होय. येथे १८७७ सालच्या दुष्काळांत एकाच अनावृष्टीने झालेल्या दुष्काळास पन्नास लक्ष लोक बळी पडले! पाऊस कमीजास्त पडणे व टोळधाडीसारखी अरिष्टें येणे या गोष्टी जरी मनुष्याच्या हातच्या नाहीत, तरी त्याचे निवारण थोड्या बहुत प्रमाणाने माणसांस कसे करितां येईल व यदाकदाचित् तें करितां आले नाही तरी या दोन कारणांनी, लोक जर सुखी असतील, त्यांच्यामध्ये जर काही त्राण असेल, तर दुष्काळ न होता, त्यांचे संकट मनुष्यहानीशिवाय केवळ महगाईवर कसें निभावून जाईल, या गोष्टी. वरील विवेचन व त्याच्या पुष्टीकरणार्थ दिलेली निरनिराळी चार उदाहरणे, यावरून वाचकांच्या लक्षात आल्या असतील. आतां आपण दुष्काळ पडण्याच्या तिसऱ्या कारणाकडे वळून ते आपल्या देशास कितपत लागू पडतें हे पाहूं. तिसरे कारण-हिंदुस्थानांत प्रत्यक्ष शेतकीवर निर्वाह करणारे शेतकरी लोक, झणजे जमिनीचे मालक व त्यांची कुळे मिळून एकंदर अजमासें अठरा कोटी ह्मणजे शेकडा सरासरी ६० आहेत. परंतु ज्यांची उपजीविका केवळ शेतकीवर अवलंबून आहे, अशा सर्व लोकांचा