पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ प्रख्यात फ्रेंच लेखक कव्हिअर ह्मणतो की, हल्लींच्या काळांत कोणत्याही देशांत दुष्काळ होणे शक्यच नाही." आणि हे खरे आहे. एकाद्या देशांत पावसाच्या कमी जास्त पडण्याने किंवा धाडीने वगैरे पिकाची नासाडी होण्याचा संभव आहे. पण त्या देशांतल्या लोकांस द्रव्यादिकांची अनुकूलता असल्यास सध्यां व्यापारांची साधनें अनुकूल झाल्यामुळे ते आपल्या गरजा परदेशांतून धान्य आणून भागवितील आणि तेथे दुष्काळाऐवजी फक्त महागाईच हाईल. युरोपखंडाच्या पश्चिम भागांत कित्येक वेळां पिकाची नासाडी झाली. परंतु साऱ्या एकोणिसाव्या शतकांत इ. स. १८४७ च्या आयलैंडांतील एका साधारण दुष्काळावांचून दुसरा एकही दुष्काळ तेथे पडला नाही. लोकांची स्थिति , साधारण बरी असली ह्मणजे आमच्या पहिल्या दोन कारणांनी महागाईपेक्षा अधिक काही होत नाही. याचे दुसरें उदाहरण इ. स. १८७६ सालांतील बंगालचा दुष्काळ हे हाय. मि. दत्त यांनी लंडन टाईम्स पत्रांत लिहिले आहे की, " सदर प्रसंगी लोकांनी आपल्या मागील शिलकीवर उपजीविका केली आणि मला पोरकी पोरें, मातारी माणसे आण बायका यावांचून कोणासही मदत करण्याचा प्रसंग आला नाही." या संबंधाचे तिसरे उदाहरण टाईम्स ऑफ इंडियाच्या खास बातमीदाराने, त्या पत्रास कळविलेल्या मोर्वीसंस्थानच्या स्थितीचे होय. हा बातमीदार ह्मणतो" मोर्वीसंस्थान कच्छचे रणांत असल्यामुळे तेथली जमीन अगदीच नापीक आहे. या संस्थानची लोकसंख्या अवघी एक लक्ष चौदा