पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कमजास्त पाऊस पडून पिकांचा नाश होणे किंवा टोळ वगैरेच्या धाडी येऊन पिके हाती न लागणे या दोन गोष्टी केवळ ईश्वरी ईच्छेवर अवलंबून आहेत. त्यांचा प्रतिकार मनुष्यास कोणत्या रीतीने कितपत करितां येईल याचे विवेचन वर करण्यांत आलेच आहे; आणि यासच अनुसरून इंग्लंडांतील राजपक्षाची मंडळी असे प्रतिपादन करितात की, " हिंदुस्थानाच्या लोकांकरितां दुष्काळासारख्या प्रसंगी आह्मांला करितां येण्यासारखी गोष्ट मटली ह्मणजे, दुष्काळ कामें काढून उपाशी मरणाऱ्या लोकांचे जीव वाचवावयाचे, व सुबत्तेच्या दिवसांची वाट पहावयाची. ह्या त्यांच्या बोल. ण्यांत किती तथ्य आहे, याचा विचार पुढे होईलच; परंतु सध्यां इतके सांगणे अवश्य आहे की, वरील दोन कारणे ही हिंदुस्थानाच्या दुष्काळाची खरी कारणे नव्हत. तर हिंदुस्थानांत जो सततचा दुष्काळ पडला आहे, तेथें जे सर चार्ल्स इलियट साहेबांच्या मताप्रमाणे शेतकऱ्यांपैकी निम्मे लोक नेहमींची उपासमार काढीत आहेत व सर हंटरच्या मताप्रमाणे चार कोटी लोक अर्ध पोटी राहत आहेत; त्या दुष्काळाला या दोन कारणांनी होणारी पिकाची नासाडी त्याच्या बीजरूपांतून काढून प्रकट करते. सर वुइल्यम वेडरबर्न, व रेव्हेन्यु कमिशनर सारख्या सरकारी बड्या अधिकारावर कित्येक वर्षे काम केलेले आणि आमच्या पंधराव्या राष्ट्रीय परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष सर रोमेशचंद्रदत्त यांचे ह्मणणे तरी हेच आहे, ते झणतात: « The failure of crops is not the cause but only the occasion of famine."