पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झालें, शेकडोंशे कुटुंबे उध्वस्त झाली आणि लाखों लोकांवर यमाजीपंताची करडीनजर गेली. ___ आतां वर सांगितल्याप्रमाणे या धाडी जरी सर्व शक्तिमान् ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून असल्यामुळे मनुभ्यांनी केलेली धडपड व्यर्थ होते. तरी स्वस्थ बसता कामा नये, प्रयत्न करण्याचे काम आपलें, आणि त्यांत यश देण्याचे काम ईश्वराचे आहे. अशा अरिष्टाचे प्रसंगी सरकारचे आणि लोकांचे काम मटले झणजे या दुष्ट प्राण्यांचा होईल. तितक्या खटपटीने संहार करावयाचा! टोळांचा संहार त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर करण्यापेक्षा, ते अंडावस्थेत किंवा फार तर कीटकावस्थेत आहेत, तोपर्यंतच केला पाहिजे. अंड्यांचा नाश करण्याचे काम अगदी सहज होते; रावळपिंडी जिल्ह्यांत एक साली एक दोन महिन्याच्या अवकाशांत सुमारे पांचशे मण अंड्यांचा नाश करण्यांत आला होता. ते कीटकावस्थेत असतां त्यांस पंख नसतात अशा प्रसंगी त्यांस खाड्यांत लोटून वर माती घातली की ते मरतात. काव्येतिहाससंग्रहांत छापिलेल्या 'पत्रे यादी' प्रकरणापैकी लेखांक ४९२ वरून पाहतां, अधिक अश्विन वद्य ४ शके १६७९ या दिवशी महाराष्ट्रांत मोठी टोळधाड आली होती. सदर पुस्तकाच्या याच प्रकरणांतील ४९३ व्या । लेखांत दुसरी टोळधाड शके १७२१ चे चैत्र वैशाखमासी आल्याचा उल्लेख केला असून, या धाडीमुळे 'झाडास पान राहिले नाही' असेंही झटले आहे. परंतु अशा प्रसंगी सरकारांतून कोणकोणत्या तजविजी योजण्यांत येत व लोक काय करीत या विषयींची माहिती कोठे मिळाली नाही,