पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-देशाने तर एक वर्षी टोळ मारण्याच्या कामी चार लाख रुपये खर्च केले, परंतु पिकांचे नुकसान व्हावयाचें तें झालेच! आमचे इकडे सिंध, पंजाब, राजपुताना वगैरे प्रांतात टोळांपासून वारंवार पिकाचे नुकसान होते. इ. स. १८८५।८६ साली पुनः ही धाड दक्षिणेत आली त्यावेळी एकव्या कोल्हापूर संस्थानांत चार महिन्यांत ५१९ मण टोळ मारण्यांत आले. साल मजकुरी (१९०४) तर सर्व देशभर अत्यंत भयंकर टोळधाड येऊन तिने जबरदस्त नुकसान केले.कोंकणांत पिकणारे उन्हाळी पीक व पावसाळी होणारी भाताची लागवड तर त्यांनी अगदी फन्ना उडवून नाहीशी करून टाकिली. देशावरही त्याचप्रमाणे फार नासाडी केली. परंतु सन १८८२ सालाप्रमाणे सरकारकडून त्यांच्या प्रतीकारार्थ फारसे उपाय करण्यांत आले नाहीत; व जे काही करण्यांत आलें तें " वराती पाठीमागून घोडे " या ह्मणीप्रमाणे शेतांतील पेरलेली रोपे खाऊन टाकल्यानंतर होय. यासालीं सरकारच्या कवडीचुंबकत्वाचाही अनुभव पुष्कळ पाहण्यास सांपडला आणि रयतेच्या निकृष्टस्थितीविषयी व त्यांच्या होत असलेल्या दैन्यतेविषयी सरकारचे मनांत फारच । अनास्था दिसून आली. टोळसुपरिंटेंडंटला ओझींच्या ओझीं पगार देऊन शेरभर ( ८० तोळ्यांचा ) टोळ मारून । आणणारांस अवघ्या दोन दिडक्या सरकारने ठेविल्या होत्या व ज्या वेली टोळांचा उपद्रव कमी होऊन ते तुरळक राहिले त्यावेळी भाव वाढवून आपल्या कंजूषपणाचे प्रदर्शन खुले केले होते. ही टोळधाड कमीजास्त प्रमाणाने सारखी वर्ष भर असल्याने तीच्यापासून कोट्यावधि रुपयांचे नुकसान