पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि असंख्य टोळांच्या लाखों झुंडी महाराष्ट्रांत संचार करूं लागल्या. एवढा महाप्रतापी दैदीप्यमान सहस्ररश्मी सूर्य नारायण परंतु त्याच्याही तेजाला लोपवून या झुंडींनी त्या वर्षी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची आठवण लोकांस दिली. ह्या टोळ्या प्रवासाला निघाल्या ह्मणजे मोठा थोरला प्रचंड ढगच आकाशांत गमन करीत आहे, असे वाटते. त्यांच्या पंखांचा शब्द ह्मणजे मोठ्या झंजावाताचा सोसाटा ! ते जेथें बसत तेथें चार सहा घटकेंत इंच दीड इंच जाडीचा लेंड्यांचा थर पसरीत आणि हिरव्यागार पिकाचे कात्रे पाडून निसंतान करीत. इतकेच नव्हे तर किती एक मैल - पर्यंत मे ठमोठया वृक्षांवर नुसते पान राहू देत नसत, काही वृक्ष तर त्यांच्या भाराने जमीनदोस्त झाले होते; त्यांना मारण्याकरितां याप्रसंगी लोकांनी आणि सरकारानी अगदी जिवापाड मेहनत केली! शाळामास्तर, तलाठी, कारकून, मामलेदार, फार तर काय सरकारच्या बहुतेक सर्व खात्यांतील नोकरांस टोळ मारणाऱ्या या सुपरवायझरा" वांचून दुसरें काम नाही. कचेरीत कांटा लावून रोज खंडोगणती टोळांची प्रेतें जोखून घेऊन टोळ मारणारांस बक्षिसे देण्याचा क्रम सुरू झाला! परंतु ध्यर्थ! ईश्वरी करणीपुढे यःकश्चित् मानवी प्रयत्न काय टिकणार! त्या टोळांना जेव्हां अनायासें समुद्रस्नान घडले, तेव्हांच लोकांचे संकट टळले. ग्रीस देशांत अनेक वेळां टोळधाड आलेली आहे. स्वीडनच्या बाराव्या चार्लस राजाच्या सैन्याने तर टोळांपुढे अगदी हात टेकले. इ. स. १७८० साली ट्रान्सलव्हेनिया प्रांतात पंधराशे लष्करी लोक टोळ मारण्यास लागले होते, परंतु बिचाऱ्यांचा काहीच उपयोग झाला नाही. फ्रान्स