पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

णाम हवेवर कसकसा घडेल वगैरे गोष्टींची अनुमाने नेहमी - प्रसिद्ध करण्यात येतात. परंतु या संबंधाने सिद्धांत ठर विण्याइतकी माहिती अद्यापि गोळा झाली नाही. या कामा साठी आपल्या देशांत निरनिराळ्या ठिकाणी मिळून सुमारे दोनशे निरीक्षण गृहे स्थापन करण्यांत आली असून, तेथील कामदारांची निरीक्षणें यूरोप व अमेरिका खंडांत शास्त्रज्ञ लोकांकडे पाठविण्यात येतात. या कामी आपले सरकार दरसाल जवळ जवळ तीन लक्ष रुपये खर्च करितें, परंतु त्याचे श्रेय पाऊस व वादळे या संबंधाने नक्की सिद्धांत ठरवून कधी मिळेल तें खरें. आपल्यामधील शास्त्रज्ञ पंडितही या संबंधांत अगदीच स्तब्ध नाहीत सुमारे वीस वर्षांच्या अंतराने सूर्यावर एक प्रकारचे काळे ठिपके दिसू लागतात. आणि ते दिसू लागले ह्मणजे, सूर्याची उष्णता किंचित् कमी होते आणि यामुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ कमी होऊन पाऊस थोडा पडतो, अशा प्रकारचा शोध आमचे जगद्विख्यात् ज्योतिर्विद कै. प्रो. केरूनाना छत्रे, यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. परंतु अलिकडे हे तत्वही अनुभवाच्या कसोटीस चांगलेंसें 'न उतरल्यामुळे पंडित मडळांत टाकाऊ ठरले आहे. दुसरे कारण-टोरांच्या व पाखरांच्या वगैरे धाडी देशावर येणे हे होय. ही गोष्टही लोकाच्या ह तची नाही. मनूने आपल्या स्मृतींत, देशावर येणारी जी सहा अरिष्टें सांगितलीं आहेत; त्यांत या टोळधाडीची गणना केली आहे. या धाडी आल्या असतां त्यापासून होणारे नुकसान लोकांस आपल्या प्रयत्नानी, थोडें बहुत कर्मी करितां येण्याचा संभव आहे. इ. स. १८८२ साली पिके चांगली तयार झाली