पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपलें ठाणे कायमचें उठविले असते. परंतु आमी रेलवेकडे तीस कोट रुपये खर्च केले, आणि पाटाकडे काय ते तीनच कोट ! आतां तरी पाटांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे की नाही ? या संबंधांत अत्यंत भक्कम पुरावा मटला ह्मणजे सध्या हिंदुस्थानच्या ज्या भागांत असे कालवे आहेत, त्या भागांत अनावृष्टीने पिकास मुळीच धोका पोचत नाही हा होय. सरकारानी जरी कालव्याची कामें चालविली आहेत, तरी ती यापेक्षा जास्त नेटाने चालविली पाहिजेत. या कामांत खर्च झालेल्या भांडवलावर अलिकडे, सहा टक्यापेक्षा अधिक व्याज पडूं लागले आहे, तेव्हां त्यांत सरकारचा फायदाच आहे. देशांत रेलवेचा विस्तार बराच झाला आहे. करितां ऑ. प्रो. गोखले ह्मणतात, त्याप्रमाणे रेलवेची कामें जेव्हां सरकाराजवळ शिल्लक राहील, तेव्हांच करावीत. आणि इतर प्रसंगी पाट बांधण्याचे कामी खर्च करावा. - असो. पाऊस कम जास्त पडल्यामुळे होणारे पिकाचें नुकसान सरकारास अथवा लोकांस टाळतां येण्याचा दुसरा मार्ग मटला ह्मणजे, पाऊस कमजास्त पडावयाचा असतां, हवेत कसकसे फेरबदल होतात, याचें पांचपन्नास वर्षे चांगले निरीक्षण करून, त्यापासून मिळणाऱ्या अनुभवावरून सिद्धांत ठरवून, खडतर सालांत निभाव लागावा ह्मणून पूर्व तजवीज करणे हे होय. याच उद्देशाने आकाशस्थ चमत्कारांचे उद्घाटन करप्याकरितां जमीनीवर व पाण्यांत एक मोठे खातें सरकारांतून काढप्यांत आले आहे. या खात्यांतून पर्जन्य कधी सुरू होईल, तो किती पडेल, वारा कोणत्या दिशेस किती वेगाने वाहत आहे, त्याचा परि