पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थानांत कालवे बांधून पाण्याचा पुरवठा करणे या विष. यावर एक मोठा विस्तृत निबंध वाचला. त्यात त्यांनी कालव्याचा विस्तार केल्याने हिंदुस्थानांतील दुष्काळ टळतील आणि आगगाडीचे रस्ते करण्यापेक्षां कालवे बांधावे हे चांगले; कारण याच्या योगानें कालव्यांतून गलबतें चालवून व्यापारासही उत्तेजन देता येईल, असा कालव्यांपासून होणार दुहेरी फायदा दाखविला आहे. श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी गेल्या सुमारे दोन वर्षांपूर्वी आपल्या राज्यांत एका कालव्याचे कामास सुरवात करते वेळी जें उत्कृष्ट भाषण केले, त्यांत दुष्काळाचे वेळी लोकांचे संर• क्षण करण्याकरितां सरकार जी कामें करतें त्याचे तीन वर्ग केले आहेत. " सडका व खडी वगैरे कामांनी लोकांचे तत्कालीन रक्षण होते; आगगाड्यांच्या कामांनी बाहेरून धान्याचा पुरवठा करितां येतो, परंतु पाटाची कामें केल्यास दुष्काळ कायमचे टाळतां येतात." असे प्रतिपादन केले आहे. एकावेळी असलेल्या मुंबई प्रांतिक सभेच्या स्वागत कमेटीचे अध्यक्ष व पुणे हायस्कूलचे माजी हेडमास्तर रा. ब. विठ्ठलराव पाठक एम. ए. यांनीही सरकारास दुष्काळ निवारण्याच्या कामी ज्या सूचना केल्या आहेत, त्यांत कालव्याच्या कामास अग्रस्थान दिले आहे. पार्लमेंटांतील सभासद मि. सम्युअल स्मिथ, कामन्स सभेत दुष्काळावर वादविवाद चालला असतां ह्मणाले की, " हिंदुस्थानांतील दुष्काळ कालवे आणि बंधारे बांधल्यावांचून कमी होणार नाही. आमी गेल्या पन्नास वर्षांत रेलवेकडे जी रकम खर्च केली ती जर कालव्यांच्या कामी खर्च केली असती तर हिंदुस्थानच्या बऱ्याच भागांतून दुष्काळाने