पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोध्यावधि रुपये खर्च करणाया आमच्या सरकारांनी असल्या युक्तीचा फायदा घेतल्यावांचून ठेवला नसता. वरील सर्व विवेचनावरून दुष्काळ पडण्याची, आह्मी जी कारणे दिली आहेत त्यापैकी पहिले, ईश्वरी इच्छेवर किंवा सृष्टिनियमांवर अवलंबून असल्यामुळे, त्यापासून पडणारा दुष्काळ, किंवा ते कारण देशांतल्या एकाद्या प्रांतापुरतेच असल्यास होणारी महागाई, सदर कारण अपरिहार्य असल्यामुळे आपणांस थोडी बहुत तरी नडल्यावांचून राहणार नाही. या संबंधांत सरकारचे पहिले कर्तव्य, म्हणजे हिंदुस्थानांत असलेल्या मोठमोठ्या नद्यांचे व नदांचे पाट बांधून शक्य असेल तितक्या लागवड जमिनीस पाण्याचा पुरवठा करणे हे होय. ही वहिवाट येथे सुमारे दोन हजार वर्षांपासून चालत आहे. अगदी अलीकडे म्हटले तर फिरोजशहा तघलख याने तीन मोठमोठाले व कांही लहान कालवे बांधून शेतकीच्या कामास फार मदत केली. त्याने बांधलेला एक मोठा कालवा अद्यापि चालू असून सध्या आपल्या सरकाराकडून, त्याची दुरुस्ती होत असते. सरकारांनी हे खातें बरेंच वाढविले आहे. सध्यां ब्रिटिश इंडियांत असलेल्या जवळ जवळ वीस कोटी एकर लागवड जमिनीपैकी एक कोटी एकर जमिनीस कालव्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. रॉयल इंजिनिअरिंग खात्यांतील बडे कामगार व हिंदुस्थानांत कालव्याची कामे करण्यांत आपल्या वयाची पंचेचाळीस वर्षे खर्ची घातलेले, सर आर्थर कॉटन साहेब यांनी सन १८६५/६६ सालच्या भयंकर दुष्काळानंतर पुढच्याच वर्षी, ईस्ट इंडिया असोसिएशनपुढें ॥ हिंदु