पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आतां घटकाभर जंगलें तुटल्याने पाऊस कमी पडतो असे जरी आपण गृहीत धरिलें, तरी देखील इ. स. १८७८ साली सरकारांनी जंगलचा कायदा पास केला व जंगलची वाढ कशी करावी वगैरे बाबतींत शिक्षण देण्याकरितां डेराडोन येथे एका वर्गाची स्थापना केली. तेव्हापासून राखून ठेवलेल्या जंगलाचे मान सारखें वाढतच आहे. इ. स. १८८११८२ साली अशा प्रकारचे जंगल हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांत मिळून अवघे ४६२१३ चौरस मैल होते. तेच पुढील दहा वर्षांच्या अखेरीस ५९७४३ मैल झालें, व हल्ली सरकारी जंगल १३१००० चौरस मैलांवर पसरले आहे. या जंगल वाढीचे खूळ इतकें माजलें आहे की, पुष्कळ - वेळां प्रजेच्या त्यापासून अनंत गैरसोई होत आहेत. परंतु या विषयींचे विवेचन दुष्काळाच्या चौथ्या कारणाचा विचार करते वेळी होणार असल्यामुळे, सध्या या संबंधाने येथे लिहिण्याचे कारण नाही. अशा प्रकारे जंगलाची वाढ होत असतां तीस न जुमानताही पाऊस कमजास्त पडतो, असें असून जंगले तुटली ह्मणून पाऊस पडत नाही, अशा प्रकारचे रडगाणे गात बसणे आह्मांस बरोबर दिसत नाही. - थोड्याच दिवसांपूर्वी एका फ्रेंच गृहस्थाने, आपण काही शास्त्रीय प्रयोग करून औरस चौरस शंभर मैलांवर पर्जन्य पाडतों, याबद्दल आपणांस एक लाख रुपये बक्षिस द्यावे, आणि पाऊस न पडला तर फांसावर चढवावे अशी जाहिरात दिल्याचे प्रसिद्ध झाले होते; परंतु आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास अन्नवस्त्राची ददात राहूं नये, इतकाच जर या फ्रेंच पंडिताचा हेतु नसता, तर दुष्काळ कामावर