पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११ इंच ८८ दोकडे पडला. पुढे १८५० साली ५१ इंच १५ दोकडे पडून त्याच्या पुढल्याच सालांत पर्जन्याचे मान १०६ इंचावर गेलें ! अ.णि पुढे कमी होऊन १८७८ या वर्षी तेंच मान १२३ इंचाच्याही पलिकडे गेले. व १८९२ त १२६॥ इंच पाऊस पडला असून दुःखाची गोष्ट ही की जंगलची स्थिति तशीच असतां सन १८९९ साली अवघा २२ इंच २७ दोकडे पाऊस झाला. ह्मणजे एकदम १०० इंचाची तूट आली! । सर्व देशभर जंगले पसरली असतां पर्जन्याच्या अभावाने मोठ मोठाले दुष्काळ पडतात, व जंगलाची स्थिति बहुतेक सारखीच असतां एकवर्षी सव्वाशें इंच व दुसऱ्या वर्षी लागलाच २५ इंच पाऊस पडतो. या दोन गोष्टींवरून जर कांही सिद्ध होत असेल, तर ते हेच आहे की, जंगलाचा " आणि पर्जन्य वृष्टीचा कार्यकारणसंबंध अनुभवाशी जुळत नाही. कोंकणपट्टीत १८९६।९७ साली अतिवृष्टि होऊन उथव बुडीने शेताचे नुकसान झालें, व पिकास धोका पोहचला. १८९७९८ साली पाऊस हवा तसा लागून, जिकडे तिकडे चांगली सुबत्ता झाली. आणि १८९८।९९ सालीं अनावृष्टीने शेतें सुकल्यामुळे पिके आली नाहीत. ही लागोपाठ तीन वर्षांची फक्त कोकणपट्टीचीच हकीकत पाहिली, तरी तेवढ्यावरूनही आमच्या ह्मणण्याचे पुष्टीकरण होईल. सदर तीन वर्षांत जंगलाची स्थिति बदलली नसतां पर्जन्याच्या स्थितीत निरनिराळे तीन प्रकार झाले! पहिल्या वर्षी अतिवृष्टि, दुसऱ्या वर्षी योग्य वृष्टी. आणि तिसऱ्या वर्षी अननुभूतपूर्व अशी अनावृष्टी!