पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महमुदशहा बहामनीचे कारकिर्दीत पडलेला दुर्गादेवीच्या* महाभयंकर दुष्काळाइतका दीर्घकाळी दुष्काळ हिंदुस्थानांत त्यापूर्वी व त्यानंतर आज पांचशे वर्षात कधीच पडला नाही. हा दुष्काळ केवळ पावसाच्या अभावामुळे पडला होता. असें सांगतात की, त्याप्रसंगी कित्येक ठिकाणी बारा वर्षांत पावसाचा एक थेंबही पडला नाही. यानंतर इतिहासांत नमूद असलेला दुष्काळ ह्मणजे इ. स. १६२९ चे सुमारास पडलेला. या वेळीही दोन वर्षात बिलकूल पाऊस पडला नाही. या दोनच दुष्काळांकडे जरी पाहिले तरी जंगलें असलीं ह्मणजे हवा तितका पाऊस पडतो, ह्या ह्मणण्याची निरर्थकता सिद्ध होते. आतां आह्मां जवळ असलेल्या नोंदीकडे जरी पाहिले १५ तरी हीच गोष्ट सिद्ध होते. इ. स. १८३० साली मुंबई इलाख्यांत अवघा ७१ इंच ३६ दोकडे पाऊस पडला; परंतु लागलीच एकतीस साली १०१ इंच ८३ दोकडे पडला. पुढे १८४८ पर्यंत सरासरीने दर वर्षी पाऊणशें इंचपर्यंत पाऊस पडत असतां १८४९ साली एकदम

  • दुर्गादेवी हा शब्द दुर्गडी या शब्दाचा अपभ्रंश आहे. दुर्गादेवीचे दुष्काळ दोन पडले. एक बारा वर्षांचा व दुसरा सात वर्षाचा बारा वर्षांचा दुष्काळ इ. स. १३९६ ते १४०८ पर्यंत होता. व सात वर्षाचा दुष्काळ इ. स. १४६८ ते १४७५ पर्यंत होता. इ. स १३९६ पासून १४७५ पर्यंतच्या मुदतीत वरील दोहोंशिवाय आणखी एक वर्षाचा दुष्काळ पडला. ह्मणजे एकंदर २० वर्षे अवर्षण होते. परराज्याखाली हिंदुस्थानामध्ये विशेषतः दक्षिण महाराष्ट्रांत दुष्काळाचा बराच अमल असतो; असें प्राचीन व सध्यांच्या अनुभवावरून सिद्ध होते.

संपादक