पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाश्चिमात्य शास्त्रविशारदाने काढल्याचे वाचण्यांत आले होते, परतु त्याला तरी वातावरणांत ढग असावे लागतात; व तसे असूनही प्रयोग सफळ झाला तर ठीक, नाही तर बराच खर्च फुकट जातो, शिवाय त्यापासून पाऊस पडणार तोही काही विवक्षित ठिकाणापुरताच ! कारण पर्जन्याला वायचं साहाय्य असल्यावांचून त्याचा प्रसार व्हावयाचा नाही. सारांश पाऊस जास्त पडूं लागला तर तो कमी करणे किंवा अजिबात बंद करणे जसे मनुष्याच्या हातचे नाही; तसेंच तो पडत नसल्यास पाडणें हेंही मनुष्याच्या शक्तीबाहेरचे आहे. इंग्रजी राज्य झाल्यापासून आमच्या इकडील जंगलाची फार तोड झाली; आणि ह्मणून पाऊस पडत नाही. असा अनावृष्टीसंबंधाने काही मंडळोचा आक्षेप आहे. परंतु त्यांत विशेष तथ्य आहे असे आह्मांस वाटत नाही इंग्रजी राज्य होण्यापूर्वी जंगल किती होते, व आज त्यापैकी किती तुटले, हे जरी खात्रीपूर्वक सांगता येत नाही, तरी, खड्यांचे शहरांत होणारे रूपांतर, बैलगाड्यांचे सर्व देशभर हजारों मैल पसरलेले रस्ते, लागवडजमिनीची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्येचे वाढते प्रमाण, वगैरे गोष्टींचा विचार केला असतां पूर्वीची जंगलें तुटून आज बराच प्रदेश मोकळा झाला असावा ही गोष्ट निर्विवाद ठरते. परंतु या मानाने पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. पर्जन्य कोणत्या वर्षी किती पडला यासंबंधाची सन १८३० सालापासून आज. पर्यंतची नोंद आमचे पुढे आहे; त्या पूर्वीची माहिती इतिहासावरून जी काही मिळते, त्या माहितीवरून पाहता,