पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मशीदींतून, मठांतून आणि चर्चमधून ईश्वराच्या आराधनेला सुरवात करतात. कोणी सहस्रपक्षी ग्रहमखकरून अनिष्ट ग्रहांची शांति करतात; तर कोणी चौलचे पय॑न्यकुंड उघण्याकरितां हजारों गरीब लोकांपासून मिळविलेल्या वर्गणीची त्यांत आहुति देतात; कोणी महादेवाला कोंडतात तर कोणी त्याच्यावर संततधार धरून तिच्या सांगते का रितां नित्य मिष्टान्न पुष्ट भिक्षुकांस लाडू चारतात; कोणी रोजे करितात आणि फकीरांनां खिचड्या वाटतात; कोणी धर्मपुस्तकें उघडून त्यांतील भाग वाचतात; कोणी पियानोच्या सुरावर प्रभूची आणि त्याच्या आवडत्या लेकराची, प्रार्थना करि. तात; असे एक की दोन! जो तो आपापल्या मताप्रमाणे पाऊस पाडण्याची खटपट करितो. परंतु व्यर्थ ! जी गोष्ट केवळ परमेश्वरी इच्छेवर, अर्थात् तत्प्रणीत सृष्टिनियमांवर अवलंबून असणार, ती फिरविण्याचे सामर्थ्य यःकश्चित् मनुष्यप्राण्यांत कोठून येणार ? अमुक केले तर परमेश्वर संतुष्ट होऊन पाऊस पाडतो, असे आपण ठरवावयाचे आणि आपणच त्याप्र णे करावयाचे. पाऊस पडला तरी ठीक न पडला तरी ठीक च ! पूर्वीच्या काळी म्हटल्या वेळी पाऊस पाडणारे ऋषी असले, तरी ते पुराणांतले पुराणांत ! आज तरी त्यांचा काही उपयोग नाही, हे एक, आणि असें सामर्थ्य जर तत्कालीन ऋषींच्या आणि मंत्रांच्या अंगीं होतें, तर राजर्षि विश्वामित्रावर एका खाटकाच्या घरांत शिरून कुत्र्याचे फरकट चोरून आणण्याचा प्रसंग का येता हैं दुसरें ! कांही दिवसांपूर्वी डायनामैटच्या प्रयोगाने हवेत आघात उत्पन्न करून पाऊस पाडण्याची कल्पना एका