पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे. सारांश, त्याची सांपत्तिक स्थिति बऱ्या प्रकारची असली पाहिजे; असें नसेल तर शेतांत कमी उत्पन्न होऊन दुष्काळ पडेल. ह्मणून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हे सामान्यतः दुष्काळ पडण्याचे दहा कारण होय.. ११ बहुजन समाज, जर श्रीमंत असेल तर आपल्या देशांत धान्यादि सामुग्री उत्पन्न झाली नसल्यास ती परदेशांतून आणून महाग सवंग विकत घेऊन आपल्या गरजा भागवील; आणि आपणांस दुष्काळ भासू देणार नाही. परंतु तोच जर कां भिकार झाला असेल, तर परदेशचा माल येऊनही, त्याचा उपयोग न होतां लोक नित्याच्या अवश्य गरजा न भागल्यामुळे, दुष्काळरूपी महाराक्षसाच्या भयंकर जबड्यांत सांपडून प्राणास मुकतील, ह्मणून देशांत सामान्यतः दुष्काळ पडण्याचे अकरावे व शेवठचे कारण बहुजनसमाजाचे दारिद्र्य हे होय. या वर दिलेल्या अकरा कारणांनी, कोणत्याही देशांत सामान्यतः दुष्काळ पडेल; व त्यांपैकी जेथें जितकी अधिक कारणे एकवटतील तेथे त्याचे स्वरूप तितकें अधिक भयंकर होईल ह्मणजे पय॑न्य कमजास्त होऊन पिकाची नासाडी झाली, परंतु झालेले सर्वपीक शेतकऱ्याचे पदरी पडले तर जितका दुष्काळ होईल, त्यापेक्षां पर्जन्याच्या कमी अधिकपडण्यास टोळधाडीसारख्या एकाद्या धाडीचे साहाय्य मिळून, आलेले पीकही शेतकऱ्याचे पदरी न पडेल ह्मणजे ही दोन कारणे एकवटतील तर अधिक दुष्काळ होईल. एकाद्या वर्षी पावसाने जरा ओढून धरिले की, प्रत्येक धर्माचे लोक आपआपल्या समजुतीप्रमाणे, देवळांतून,