पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुळेच गेल्या दुष्काळांत पुण्यास निघालेल्या (डेकन आर्फनेज ) अनाथबालकाश्रमाचा नायनाट झाला. आणि आतां हजारों पोरक्या पोरांवर धर्मातर करण्याची पाळी आली आहे ! यासंबंधानें पंजाबांत दयानंद आंग्लवैदिक महाविद्यालयाच्या व मुंबईत प्रार्थनासमाजाच्या मंडळीने केलेला प्रयत्न फार स्तुत्य आहे. मात्र ही युक्ति अमुक पंथाच्या लोकांकडून सुचविण्यात आली आहे हाच तिच्यामध्ये काही लोकांच्या मते 'शकारी दोष' ह्मणून तिची यंदा जशी हेळसांड करण्यांत आली, तशी पुढे येऊं नये. युक्ती सुचविणारा कोणीही असला तरी ती जर आपल्या हिताची असेल तर आपण आपल्या हिताकरितां तिचा अंगिकार केला पाहिजे. असो. याप्रमाणे दुष्काळ न पडण्याकरितां लोकांस ब सरकारांस ज्या तजविजी कराव्या ह्मणून आह्मीं सुचविलें आहे, त्या अमलांत आल्यावर, बहुधा हिंदुस्थानांत दुष्काळ पडण्याची भीति नाही; आणि बरीच वर्षे अवर्षण होऊन कदाचित् एकादा दुष्काळ पडलाच तर त्यापासून निभावण्याकरितां राजा व प्रजा या उभयतांस वरील विवेचनांत आह्मीं सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे घडल्यास मनुष्यहानिही होण्याची भीति नाही. सारांश, आमच्या महा यशखी राणीसाहेबानी हिंदुस्थानचा राज्यकारभार हाती घेतेवेळी " आमच्या रयतेची अबादानी तेच आमचे सामर्थ्य, त्यांचा संतोष तीच आमच्या राज्याची मजबुती व त्यांची कृतज्ञता तेच आह्मांस उत्तम फळ, असे आम्ही समजतों" इ.जाहिर