पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०१) भव घेऊन दुष्काळ टाळण्याचे व दुष्काळ पडल्यावर त्यापासून प्रजेचे रक्षण करण्याचे उपाय शोधून काढित आहे. पहिले काम फार महत्वाचे असून त्याकरितां सरकारांत विशेष तजवीजी होणे रास्त होते; परंतु तसा प्रयत्न विशेष झालेला दिसत नाही. या दुसऱ्या कामांत मात्र सरकारांनी मन घालून बरीच व्यवस्था केली आहे. तथापि कामाची इयत्ता, फाजील दंडाची पद्धत, दुष्काळ ठरविणे, टाइम्समध्ये जे. व्ही. जे. या सहीने लिहिलेल्या लेखांत सुचविलेल्याप्रमाणे लहान प्रमाणावर ठिकठिकाणी रिलीफ कामें काढणे, पावसाळा सुरू होतांच दुष्काळपीडितांपैकी जे लोक प्रत्यक्ष शेतकी करणारे असतील त्यांस बी व अवश्य असल्यास शेतकीची जनावरें देऊन पुनः पीक हाती येईपर्यंत पोसणे, नामदार पारख यांनी सुचविल्याप्रमाणे सूट देण्याच्या कामी ऐपतदार आणि गैर ऐपतदार असा भेद म करणे व प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सूचनेप्रमाणे तहकुबी दिल्याने पुढील साली शेतकऱ्यांवर दुहेरी बोजा बसतो या करितां सुटी देणे, वगैरे बाबतीत सुधारणा झाली पाहिजे. व दुष्काळकोडाच्या नियमांप्रमाणे सर्व तजवीजी करण्याविषयी जास्त खबरदारी घेतली पाहिजे. लोक या संबंधांत आपले कर्तव्य बजावीत आहेत, परंतु ते असावें तसें समाधानकारक नाही. दयाभूतपणा आमचा स्वाभाविक गुण आहे, परंतु त्याला सद्यः स्थितीला अनुसरून थोडे व्यवस्थित स्वरूप दिले पाहिजे. हे व्यवस्थित स्वरूप नसल्या