पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०३) नाम्याच्या द्वारे प्रसिद्ध केलेले आपले वचन सत्य केलें, व आमीं प्रजाजन हिंदु, मुसलमान, पार्शी, ख्रिस्ती एकाच नौकेमध्ये बसलो आहोत, एकाचे जे हित तें दुसऱ्याचे हित. एकाचे जे नुकसान तेच दुसऱ्याचं. आपण सर्व एका कुटुंबाची माणसे आहोत, आपणां सर्वांस एकमेकांच्या सुखादुःखाचे भागीदार झाले पाहिजे, हे मनांत बाळगून आह्मी देशहिताकरितां कायावाचामनेंकरून झटलों व संकटप्रसंगी आपल्या सरकारांस व एकमेकांस अवश्य व शक्य ती मदत आपण केली,तर हल्लीचा काल असा आहे की,प्रत्यक्ष इंद्र जरी आमच्या वैरावर उठला तरी त्याच्याने आमचे नुकसान होणार नाही; पण असा दिवस उगवेल तेव्हां खरा! समाप्त. अजूद