पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१००) करण्याकरितां, सरकारांतून मुद्दाम नेमणूक करण्यांत आली; व त्यांनी आपली ती कामगिरीही बजावली. परंतु पुढे इ. स. १८६५ च्या ओरिसा प्रांतांतल्या दुष्काळाने तेथले । लोक स्वाहा केले. पुढे इ. स. १८६८।६९ सालच्या दुकाळांत लॉर्ड लॉरेन्स साहेबांनी 'दुष्काळांत एकही मनुष्य अन्नावांचून मरतां कामा नये, जर मरेल तर त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल,' असें प्रसिद्ध केलें. याचा परिणाम वर मि. नंदी यांच्या निबंधांतील एका कलेक्टराची जी गोष्ट दिली आहे तीवरून वाचकांच्या लक्षांत येईल. इ. स. १८७३।७४ च्या दुष्काळांत, दुष्काळग्रस्तांस व्यापाऱ्यांकडून, योग्य वेळी हवें तितकें धान्य पोहचत नाही; म्हणून धान्य पुरविण्याची सर्व जबाबदारी सरकारांनी घेतली आणि इ. स. १८७७ च्या दक्षिणेतील दुष्काळांत हल्लीच्या पद्धतीवर दुष्काळकामें सुरू होऊन पुढच्या वर्षी दुष्काळग्रस्तांचे संरक्षण कशाने होईल, आणि दुष्काळ न पडण्याकरितां काय तजवीजी कराव्या, हे सुचविण्याकरितां एक कमिशन नेमण्यांत आले. व त्यांनी दु काळ कोडाची प्रथमावृत्ति काढली. पुढे इ. स. १८९७ सालच्या दुष्काळांत या कोडांतील बऱ्याच चुका लोकांनी सरकारच्या नजरेस आणल्यामुळे पुनः एक कमिशन नेमण्यांत आले व त्यांनी सुधारलेला फ्यामिनकोड इ. स. १८९८ मध्ये काढला. याप्रमाणे सरकार एका शतकापेक्षाही अधिक वर्षे अनु.