पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करीत असतां सुचविलेच आहेत; परंतु सरकारचे लक्ष या उपायांकडे गेलेले दिसत नाही. बंगाल्यांत इंग्रज सत्ताधीश झाल्यापासून पहिला दुष्काळ इ.स. १७६९।७० साली पडला, आणि त्या प्रांतांत सुमारे 3 लोक अन्नावांचून मेले. तेव्हांपासून आजपर्यंत सरकारी लोक ज्याला दुष्काळ ह्मणतात असे सव्वीस दुष्काळ ब्रिटिश हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत पडले. यांतील पहिल्या पांच दुष्काळांत किती प्राणहानि झाली, याची नोंद नाही. परंतु इ.स. १८७८ पर्यंत पडलेल्या बेविसांपैकी बाकीच्या १७ दुष्काळांत एक कोटि सत्तावीसलक्ष लोक अन्नावांचून मेले, असें इ.स.१८८० सालच्या फ्यामिन कमिशनच्या रिपोर्टीत लिहिले आहे. इंग्रज लोकांचे राज्य झाल्यापासून आमाला जी शांतता मिळाली, आम्हांला जी गोड वचने देण्यात आली, आणि दुष्काळाच्या प्रसंगी आमचे प्राण वाचावे ह्मणून, ज्या खटपटी झाल्या,त्या सर्वीस न जुमानतां ह्या दुष्काळरूपी बड्या शत्रूने गेल्या शंभर वर्षांत सर्व जगांत झालेल्या लढायांत जे लोक मेले त्याच्या तिप्पट लोक, नुसत्या हिंदुस्थानांत ठार केले. यानंतर बरेच दुष्काळ पडल्यावर इ. स. १८३७ सालच्या दुष्काळाच्या वेळी काम करण्यासारख्या लोकांस सरकारांतून काम देण्याचा ठराव झाला, व पुढे इ. स. १८६०।६१ सालच्या वायव्येकडील प्रांतांत व पंजाबच्या काही भागांत पडलेल्या दुष्काळांत कर्नल बेअर्ड स्मिथ यांची, त्या दुष्काळाची कारणे, त्याचा विस्तार वगैरेचा शोध