पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९८) मध्ये दिली आहे. मराठी राज्यांत मागे एका प्रसंगी सांगितल्याप्रमाणे ओसाड जमीनीवर धान्याची आकारणी कधीच करीत नसत व आवर्षण वगैरे झाले म्हणजे प्रजेला सूट देत. तगाई देण्याची पद्धतही तेव्हां अमलांत होती. आणि शेतकऱ्यांस बी घेण्याकरितां, जमीनीत सुधारणा करण्याकरितां, जळलेली घरे बांधण्याकरितां व गुरं घेण्याकरितां तगाई देत. वरील चार प्रसंगीही हेच उपाय अमलांत आले असावे, असें न्यायमूर्ति रानड्यांच्या "पेशवाईतील रोजनामे " या लेखावरून दिसते. "प्रक्षालनातहि पंकस्य दूरादस्पर्शनं वरम् " अशी एक संस्कृत भाषेत म्हण आहे. तिचा अर्थ असा की,चिखल अं. गावर घेऊन मग धूत बसण्यापेक्षां तो अंगावर न पडेल अशीच व्यवस्था करणे चांगले. ज्याप्रमाणे एकादा प्राणी कुजून घरांत अमुक ठिकाणी पडला आहे हे माहीत असतां घरचा यजमान त्या प्राण्यास एकदम बाहेर फेंकून देण्याची तजवीज करण्याचे सोडून, काय उपाय केले ह्मणजे ही दुर्गधी नाहीशी होईल, याचा विचार करण्याकरितां कुटुंबाची माणसें एके ठिकाणी जमा करितो व बहुमताने त्या प्राण्यास तेथून काढून टाकण्याऐवजी, चंदन, धूप वगैरे जाळण्याचे ठरवून त्या कामांत बरेच पैसे खर्च करितो,तसा प्रकार आमच्या सरकारच्या या दुष्काळासंबंधाचे व्यवस्थेत झाला आहे. दुष्काळ पडू नये ह्मणून जे पूर्वोपाय करावयाला पाहिजेत ते आम्ही वर दुष्काळाच्य' कारणांचा विचार