पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९७) "दोन वर्षे सारखें अवर्षण पडले त्यामुळे लोक मलुख सोडून गेले व बहुतेक मरण पावले. वैरण न मिळून गुराढोरांचा फन्ना उडाला. प्रांताचे प्रांत ओसाड पडले. मागाहून महामारी येऊन लोकांच्या विपत्तीचा कळस झाला... (मुसलमानी रियासत, पा० २९६.). कारण, त्या वेळी अदिलशाहीत फार अव्यवस्था होती. कोणाचा जोडा कोणाच्या पायांत नव्हता. या दुष्काळाच्या प्रसंगी मंगळवेढ्यास असलेल्या दामाजीपंत नांवाच्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या ताब्यांतील सातशे खंडीचे सरकारी कोठार त्या प्रांतांतील सर्व जातींच्या लोकांस उघडे करून देऊन त्यांचे दुष्काळापासून रक्षण केल्याची हकीकत भक्तिविजयाच्या चाळिसाव्या अध्यायांत दिली आहे, ती आमच्या वाचकांच्या वाचनात आलीच असेल. पेशव्यांच्या कारकिर्दीत राज्यव्यवस्था चांगली होती, प्रजेमध्ये चांगले त्राण होते, ह्मणून मोठे दुष्काळ पडले नाहीत. मात्र इ. स. १७७०। १७८६।१७९३ आणि १८०४ या साली महाराष्ट्रांत खूप महागाई झाली होती. दुसऱ्या प्रसंगी "पुणे प्रांती धारण दीड पायली झाली होती.” तिसऱ्या वेळी "धारण चार शराची होऊन पुणे शहरांत बरीच माणसें मेली' आणि इ. स. १८०४ मध्ये तर महागाईची कमालच झाली. "धारण दडि शेरावर आली आणि माणसेंही बरीच मेली." अशा प्रकारे या चार महर्गतेची हकीकत काव्येतिहास संग्रहांतील पत्रे यादी प्रकरणाचा लेखांक ४९२ व ४९३