पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यापारांची साधनें कमीं होती ह्मणून जेथले धान्य तेथे शिलकी राही, आणि प्रसंग आला असतां लोकांच्या उपयोगी पडे. त्यांच्या संपत्तीचा झरा बाहेर वाहत नव्हता, आणि रानांवर सरकारी कटाक्ष नसल्यामुळे त्यांच्या जनावरांस चाऱ्याची किंवा जमीनीस राबाची कधी पंचाईत पडत नव्हती. यामुळे बारा बारा वर्षांच्या अवर्षणास टक्कर देऊन ते निभाव काढीत. राजे लोक अशा प्रसंगी स्वस्थ बसत नव्हते, दुष्काळाचे हल्ले येऊ नयेत ह्मणून आपली राज्यव्यवस्था जितकी सुखावह होईल तितकी करूनही ध्यानीं मनी नसणारे असे एकादें संकट जर प्रजेवर गुजरलेंच, ईश्वरी क्षोभ होऊन सतत बारा वर्षे अवर्षण पडलेच, तर प्रजेचा निभाव लागावा, विशेष प्राणहानि होऊ नये, ह्मणून ते त्या वेळच्या लोकस्थितीप्रमाणे शक्य त्या उपायांची योजना करीत. दुर्गादेवीचा दुष्काळ पडला तेव्हां महंमदशहा बहामनीने “ माळवा व गुजराथ" येथून धान्य आणण्याकरितां दहा हजार बैल ठेवून धान्य आणविले आणि तें धान्य लोकांस स्वस्त दराने विकले.कलबुर्गा, बेदर, कंदाहार, एलिचपूर, दौलताबाद,चौल,दाभोळ वगैरे ठिकाणी आणि दुसऱ्या कांहीं शहरी अनाथांकरितां भिक्षाग्रहें स्थापिली आणि ती सतत चालावी ह्मणून त्यांस मोठ्या नेमणुका करून दिल्या." (मोडककृत दक्षिणेतील मुसलमानी राज्याचा इतिहास,पान ६९.). याशिवाय सरकार धान्याची मोठमोठी कोठारे असत त्यांचाही प्रजेला चांगला उपयोग होई. इ. स. १६२९ साली