पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन ही युक्ति शेवटास जाणे जरा अशक्य दिसते; परंतु कै. न्या. रानड्यांसारखी थोर माणसें जर त्यांत मन घालतील तर ती अशक्य असली तरी सुद्धा शक्य होईल, अशी आमची खात्री आहे. असो. सरकारास यासंबंधांत करण्यासारखी सूचना म्हणजे न्युझीलंड, अबिसीनिया, अफगाण, इजिप्त, सौडन, स्वाकीन वगैरेसारख्या ज्या लढायांशी आमचा अर्थाअर्थी संबंध नसतो, त्यांचा खर्च आमांवर कधींच लादण्यांत येऊ नये. आणि ज्या लढायांत आमचा संबंध असेल, त्यांत सुद्धा आह्मी ब्रिटिश प्रजा असल्यामुळे इंग्लंडाने आमच्या बरोबर खर्चाचे भागीदार व्हावें. सध्यां जो सैन्याचा खर्च वाढत आहे, तो कमी करावा. कारण, या सैन्यापैकी आठ हजार युरोपियन सैन्य जर ट्रॅन्सवालला पाठवितां येतें व बारा हजार नेटिव्ह सैन्य जर चिनांत पाठविण्याचे ठरतें, तर आमाला येथे त्याची अवश्यकता नाही, हे उघड आहे. करितां ज्याची अवश्यकता नाही, तितकें सैन्य कमी करावें. नेटिव्ह लोकांस सर्व प्रकारची खाती मोकळी ठेवून त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचे काम चालविण्यास जे योग्य असतील, त्यांस ती कामें द्यावीत. विशेष पाल्हाळ न करितां सांगावयाचे झणजे, हिंदुस्थानांतील बहुजनसमाज सुखी व्हावा, त्यावर येणा-या दुष्काळाच्या धाडी कमी व्हाव्यात, अशी इच्छा असेल, तर सरकारांनी नुकताच दादाभाई, वेडरबन व केन यांच्या सहीनें प्रसिद्ध झालेला