हिंदु राष्ट्रवाद ६ ३ फोडून त्यांतून निसटून जाण्याचा प्रयत्न करीत होती त्या वेळीं, मोगल सेनाधिकान्यांच्या हातांखाली लढत असलेल्या मराठ्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.१ ‘नागोजी राजे यांजकडे संधान केले, तुम्ही आम्ही एक झाल्यास ही फौज मोडून हिंदुधर्म जतन करू...शिके हे मोगलांचे ताबेदार बनले. तेव्हां खंडोबा बल्लाळ म्हणाले “ तुमचे जसे शिरकाण केले, तसेच आमचेही तीन पुरुष हत्तीपायीं मारविले; परंतु हिंदूंच्या दौलतीकरितां आम्ही झटत आहोत. पुढे नादिरशहाचे स्वारीविषयी बाजीराव ब्रम्हेंद्रस्वामीस लिहितोहिंदु लोकांस फार मोठे संकट प्राप्त झाले आहे. अद्याप वसई आली नाही. आपुली घरगुती भांडणें ( रघूजीचे पारिपत्य वगैरे ) बाजूला ठेवली पाहिजेत. आतां सर्व हिंदुस्थानास एक शत्रु उत्पन्न झाला आहे. तसेच नादिरशहाच्या स्वारीविषयी आपल्या सैनिकांना उद्देशून तो म्हणतो * अरे बघता काय ? चला जोराने चाल करून. हिंदुपदपादशाहीस आतां उशीर काय ?’ असो, ह्या भूमीवर, हिंदु राजे पुरातन काळापासून राज्य करीत होते. परंतु स्वसमाजामध्ये, राज्य टिकविण्यासाठी आवश्यक अशी राजकीय ऐक्याची जाणीव कमी झाल्यामुळे मध्यंतरीं पदभ्रष्ट होऊन यवनांचे अंकित झाले. अशा प्रसंगी हिंदूनी संघटन करून हिंदुराज्य स्थापावें, म्हणजे हिंदुधर्म वृद्धिंगत होईल असे केवळ शिवाजी, संभाजी, बाजीराव इत्यादींनाच वाटत होते, असे नाही. हिंदुस्थानांतील इतर भागांतही संघटनेची ही विचारधारा कशी प्रसृत झाली होती ह्याविषयींचे पुढील पुरावे चिंतनीय वाटतील. ‘शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी' ह्या शब्दांत शिवाजी१ हिदुत्व : पृ. ६१ २ हिंदुत्व : पृ. ६४
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/72
Appearance