६२ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व हिंदुस्थान नि हिंदुधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तुर्काचा जाब तुर्कीतच दिला पाहिजे.......म्हणजे त्याच्या नांवाचे औरंगही (राजसिंहासन ) राहाणार नाहीं व जेबहीं ( शोभा) राहाणार नाही.......दोन अंतःकरणें एक होतील तर पहाड तोडतां येईल.......मला तुझ्यापासून अशी भीति नाहीं; कारण तुझ्यामाझ्यांत कांहीं शत्रुत्व नाहीं." ह्या शिवाजीच्या पत्रांतील हिंदु, हिंदुस्थान आणि हिंदुधर्म है। शब्द कोणता मनोभाव व्यक्तवितात ? ‘हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. त्यांत हिंदुधर्मावांचून दुसरा धर्म राष्ट्रधर्म म्हणून राहू शकत नाही. हाच मनोभाव वरील पत्रांत आहे. मुसलमानांकडे शत्र म्हणून पाहाण्याची हिंदूंची जी दृष्टि होती ती शिवाजीच्या मृत्यूनंतर निवळली नाही; किंबहुना ती वृद्धिंगतच झालेली आढळते. कशी ती पहा. जयपूर संस्थानच्या दप्तरांतील छत्रपती संभाजी महाराजांची दोन संस्कृत पत्रे सध्यां प्रसिद्ध झाली आहेत. संभाजीने रामसिंगास लिहिलेल्या पत्रांत औरंगजेब बादशहाला सिंहासनावरून काढून टाकण्याची प्रचंड योजना आखलेली आहे. या योजनेसाठीं संभाजीने रामसिंगाचे साहाय्य मागितले होते. पत्रांत संभाजी१ लिहिता, ‘‘आम्ही हिंदु आहोत. नी सध्यांच्या परिस्थितीत आमच्याकडून जे होणे शक्य असेल तें आम्हीं करू, असे तुम्हीं आम्हांस लिहिले. खरोखरच जर तुमची अशी इच्छा असेल तर, तुम्ही या कामामध्ये पुढारीपण घेऊन हे कार्य करावे. सध्यांचा बादशहा (औरंगजेब) समजत आहे की, सर्व हिंदु मेषपात्र झालेले आहेत नी त्यांनी आपल्या धर्माचा अभिमान पूर्णपणे सोडलाहीं आहे. इतिहासप्रसिद्ध जिंजीच्या वेढ्यांत, ज्या वेळी मराठी सैन्यें तो वेढा १ पुरुषार्थः
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/71
Appearance