पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाश्चिमात्य राष्ट्रवाद २ पाश्चिमात्य राष्ट्रांचा उदय केव्हां नि कसा झाला जोसेफ१ म्हणतो :- स्पॅनिश द्वीपकल्पांत स्वराष्ट्राच्या अखंडत्वासाठी जेव्हां स्पॅनिश लोक नेपोलियनविरुद्ध युद्धास उभे ठाकले, तेव्हां शुद्ध राष्ट्रीयत्वाची बीजें प्रथम अंकुरलीं, असे दिसते.” | मूर' म्हणतो :- राष्ट्रीयत्वाची कल्पना ही तर फारच आधुनिक आहे. फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी कोणाही राजकारणी पुरुषाने अथवा राज्यशास्त्रज्ञानें राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन कोठेही केले नव्हते. आणि कदाचित् दुस-या कोणीं ते प्रतिपादिले असते तर ते प्रमाणभूत म्हणून स्वीकारलेही गेले नसते.” प्रो. हेज् म्हणतो :-‘‘ आधुनिक राष्ट्रवादाचा उगम युरोपमध्ये अठराव्या शतकांत झाला. हें शतक क्रांतिगर्भ होते. लिखित इतिहासाच्या कोणत्याही वेळी झाले नसेल इतकें आत्मसंशोधन आणि विश्लेषण या शतकांत झाले. प्रो. हॅन्स् कोहेन म्हणतो :-१६ अठराव्या शतकापासून युरोपमध्ये राष्ट्रवादाने धर्माला खो देऊन मानवी मनावर सत्ता गाजविण्याचा मक्ता आपणाकडे घेतला आहे. आणि आपल्या ह्याच मताची पुनरुक्ति त्याने Idea of Nationalisin ह्या आपल्या नवीन ग्रंथांत केली आहे. । आल्फ्रेड् कॉबमन्” म्हणतो :- राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद हे शब्द आधुनिक अर्थाने, कांहीं अपवाद सोडल्यास, एकोणिसाव्या शतकापूर्वी क्वचित् योजिले जात.” । १ बर्नार्ड जोसेफ : नॅशनलिटि ऍड् इटस् प्रॉब्लेम्स् , पृ. १७९ २ रॅम्से मूर : नॅशनॅलिझम् अँड इंटरनैशनलिझम् पृ. ३७ ३ प्रो हेज् : इव्होल्युशन ऑफ् मॉडर्न नॅशनैलिझम् , पृ. ८-९ ४ प्रो. हॅन्स् कोहेन : नॅशनॅलिझम् इन् फार ईस्ट , पृ. ८ ५ आल्फ्रेड् कॉबन् : डिक्टेटरशिप् इटस् हिस्टरि अँड थिअरि, पृ. १६३