पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व ० साह्यभूतही होऊ शकतात, तिला वळण देऊ शकतात आणि त्या भावनेस पवित्र देशभक्तींत परिणत करू शकतात. दुस-या एकाचे म्हणणे असे :-‘‘आपल्या इच्छाविरुद्ध युद्ध घडवून आणण्याचे कर्तृत्व राष्ट्रावादाकडे जाते. ह्या तत्त्वज्ञानाची आयुर्मर्यादा संपलेली नाही, हे एक कटु सत्य आहे; आणि त्याचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून विचार करणे आवश्यक आहे. मानवी जविनांतील अनेक शक्तींप्रमाणे ही भावना कांहीं भौतिक अथवा यांत्रिक नाही; तर ती जिवंत समाजाची व्यक्तिगत जाणीव आहे. ह्या जाणिवेस बेटासारखा, नदीच्या आखातासारखा, अथवा डोंगराळ प्रदेशासारखा निश्चित चतु:सीमा असलेला एक देश; एक संप्रदाय; तसेच जिच्यामध्ये वाङ्मयनिर्मिति झाली आहे अशी एक भाषा; आणि ह्या सर्वांहूनही अत्यंत सूक्ष्म परंतु परिणामकारक अशी शक्ति म्हणजेच समान परंपरा, अथवा भूतकालिन स्मृतीचा वारसा ह्या घटकांपासून प्रेरणा मिळते. |हर्टस्' म्हणतो :--* कोणत्याही राजकीय तत्वज्ञानापेक्षां राष्ट्रवादाची प्रेरक शक्ति अधिक प्रभावी ठरली आहे. राष्ट्रवादामुळे महान् राज्यक्रांत्या नी युद्धे झाली, आणि त्याच्या धक्क्याने मोठमोठी साम्राज्ये सुद्धां नामशेष होऊन जगाचा आलेख (नकाशा) पालटला गेला. त्याच्या ओघास आर्थिक हितसंबंध, नीतितत्वे किंवा धर्म यांपैकी कशानेही बांध घातला गेला नाही. किंबहुना त्याच्या धक्क्याने आपली भौतिक संस्कृति एखाद्या खोल गर्तेत पडण्याची वेळ आली आहे." ह्या वर दिलेल्या उतान्यांवरून ‘राष्ट्रवाद' ह्या तत्वज्ञानाचे सामर्थ्यं किती आहे याची कल्पना येण्याजोगी आहे. अशा ह्या बलशाली कल्पनेचा उद्भव कुठल्या भूभागावर नी कोणत्या काळी झाला ते आतां पाहूं. १ फ्रेडरिक हर्टस् : नॅशनलिटि इन् हिस्टरि ऍड् पॉलिटिक्स् पृ. १