Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व रॉयल् इन्स्टिटयूट्ने प्रकाशिलेल्या ग्रंथांत' असे म्हटले आहे की :- * राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व ह्या कल्पनांचा प्रादुर्भाव जरी फार प्राचीनकाळी झालेला दिसला, तरी एक राजनैतिक शक्ति म्हणून राष्ट्रवाद हा फ्रेंच राज्यक्रांति नी तिनें निर्मिलेल्या परिस्थितीचा परिपाक आहे.' राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांच्या प्रादुर्भवाच्या काळासंबंधीं पाश्चिमात्य तज्ञांची मते वरीलप्रमाणे आहेत. त्या सर्वांचा आपाततः विचार केला तर आपणांस असे निर्धास्तपणें म्हणता येईल की, आधुनिक राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाचा उद्भव हा गेल्या दोन शतकांमध्येच झालेला आहे. आतां राष्ट्र निर्माण करणा-या घटकांचा अभ्यास करूं, ३ राष्ट्राला राष्ट्रपणा देणारे कांहीं महत्त्वाचे घटक वंश :- या विषयीं जोसेफ म्हणतो :-* वंशाची जाणीव ही मानवांवर नी राष्ट्रांवर निःसंशय फार मोठा परिणाम करते. ज्या कांहीं ठिकाणीं वंशशास्त्रज्ञाला कुठल्याही प्रकारचे सगोत्रत्व आढळत नाहीं, तेथे ही एकवंशाची जाणीव आपले कार्य करते; कारण तिच्या सजातीयत्वाच्या भावनेनें ममत्वबुद्धि जागृत होते. काही वेळां राष्ट्रातील राष्टिकांचा ‘ आपण एक-वंशीय आहोत' असा विश्वास असणे-मग सत्य सृष्टींत तसे असो वा नसो-हाच, अंशतः, राष्ट्रनिर्मितीचा एक घटक ठरतो.' (पृ. ४७ ) स्मिथ म्हणतो :-म्हणून येथे असे मत प्रतिपादिले आहे की, एक राष्ट्र-निर्माता घटक या दृष्टीने वंशाला (वंशैक्य) किती महत्त्व द्यावयाचे ही गोष्ट निव्वळ ज्याच्या त्याच्या मानण्यावर अवलंबून आहे. (तथापि) वंशैक्याच्या भावनेला राष्ट्रीय जीवनांत जे महत्त्वाचे स्थान । १ रॉयल् इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स : नॅशनलिझम्, पृ. ३१