पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

 पाश्चिमात्य राष्ट्रवाद ३


आहे. तसें केल्यानें आपल्या 'राष्ट्र' विषयक विचारांवर लख्ख प्रकाश पडेल, त्या संबंधीच्या शंकाकुशंका दूर होऊन पूर्वग्रह झिंझाटले जातील, आणि विशुद्ध विचारास वाव मिळून हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व सिद्ध करणे सुकर होईल. राष्ट्र, राष्ट्रीयत्व नि राष्ट्रवाद यांची परिपूर्ण कल्पना सौकर्यानें यावी यास्तव ह्या प्रकरणांतील विवेचनाची मांडणी अशी केली आहे :-

(१) राष्ट्रवादावरील पाश्चिमात्य विचारवंतांचीं मतें. 
(२) पाश्चिमात्य राष्ट्रांचा उदय केव्हां नि कसा झाला. 
(३) राष्ट्राला राष्ट्रपणा देणारे काही महत्त्वाचे घटकावयव. 
(४) राष्ट नी राष्ट्रीयत्व यांच्या काही प्रसिद्ध व्याख्या. 
(५) तदनुसार पाश्चिमात्य राष्ट्रांच्या उभारणीची पाहणी.
(६) या सर्वांवरून हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व ठरविण्यास उपयोगी पडणाऱ्या लक्षणांविषयी निगमन.
इतक्या प्रास्ताविकानंतर आपण आतां थोडक्यांत पाश्चिमात्य राष्ट्रकल्पनेचा इतिहास पाहूं.
१ राष्ट्रवादावरील पाश्चिमात्य विचारवंतांची मते

डॉ. ओके स्मिथ¹ म्हणतो :- "आधुनिक युगांतील राष्ट्रभावनेचें जिव्हाळ्याचे, तीव्र नी प्रभावी स्वरूप पाहिलें म्हणजे राष्ट्रभावना हा मानवाचा मूळ, आदिकालीन उपजत स्वभाव नसून मंद, विकसनशील अशी ती एक मानवी भावना आहे, हें म्हणणे सहजासहजीं विश्वसनीय वाटत नाहीं. या मानवी भावनेवर असंख्य घडामोडींचा परिणाम होत असल्याने त्या जशा तिचा विकास खुंटवूं शकतात, मार्ग बदलूं शकतात, किंवा तीस नामशेषही करू शकतात, तद्वतच तिच्या विकासाला त्या


१ डॉ. स्मिथः रेस अँन्ड् नॅशनलिटि, पृ. १५९.