पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व राष्ट्रवादाविषयींच्या प्रचलित विचारधारा तर्कशुद्ध अशा ऐतिहासिक नि तौलनिक दृष्टीने परीक्षिल्यावांचून कोणत्याही राष्ट्रवादावर कुठलाही आक्षेप घेणे हें अन्याय्य आहे. परंतु एकदां हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व शास्त्रीय पद्धतीने निश्चित केले गेले म्हणजे मग, तो अधिकृत राष्ट्रवाद वगळून राष्ट्रवादाच्या इतर सर्व विचारधारा-मग, ती हिंदुराष्ट्रवादाची असो, हिंदीराष्ट्रवादाची असो, किंवा दुस-या कोणत्याही राष्ट्रवादाची असोआपोआपच अशास्त्रीय म्हणून चुकीच्या ठरतील. परंतु हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याच्याही आधी राष्ट्र नि राष्ट्रीयत्व या संज्ञांचे सर्व संमत अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. कारण ‘राष्ट' या कल्पनेचीं जीं सामान्य अथवा सर्वमान्य अशी लक्षणे असतील ती हिंदुस्थानांतील लोकसमुदायांस लावूनच येथील राष्ट्रीयत्व ठरवावे लागेल. गेल्या शतकांत हिंदुस्थान सुशिक्षित झाला तो इंग्रजी भाषेच्या द्वारेच, त्यामुळे त्याच्या मनावर पाश्चिमात्य विचारांचा परिणाम साहाजिकच झाला. अशास्थितींत हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या राष्ट्र नि राज्यशासन या प्रामुख्याने राज्यशास्त्रीय कल्पनांवरही पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव पडणे क्रमप्राप्तच होते. अर्थातच ‘हिंदुस्थान राष्ट्र आहे काय ? या प्रश्नाची चर्चाही त्या गोष्टीस अपवाद कोठून असणार ? मात्र अशा चर्चेत घडतें तें हैं कीं, पाश्चिमात्य राज्यशास्त्र हे गेल्या तीन शतकांत पश्चिम गोलार्धात झालेल्या अनेक क्रांत्यांतून उद्भवले; आणि पाश्चिमात्य राष्ट्रांची सद्यःस्थिति बारकाईने तपासली तर आपल्या कल्पनेहून फारच निराळी वस्तुस्थिति तेथे असलेली आठळते; ह्या अवश्य ध्यानात घ्यावयाच्या बाबींकडे बहुधा बहुतेकांचे दुर्लक्षच होते. तेव्हां निदान प्रस्तुत विषयाच्या अभ्यासांत हा दोष राहूं नये यासाठी राष्ट्र अथवा राष्ट्रीयत्व यावरील पाश्चिमात्य अधिकारी लेखकांचे विचार वरील दोन बाबी दृष्टीआड न होऊ देतां अभ्यासिणे आवश्यक