पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व


प्रकरण १ लें। C-6= पाश्चिमात्य राष्ट्रवाद ‘हिंदुराष्ट्रवाद' हा शब्द कानी पडतांच सर्वसामान्य माणूस दचकावा इतका द्वेषी नि तिखट प्रचार ह्या शब्दाच्या बाबतींत विरोधकांकडून झालेला आहे. हिंदुराष्ट्रवादाचे विरोधक प्रचार करतात तो असाः - | हिंदुत्वाला उचलून धरणे हा जातीयवादाचा, अराष्ट्रीय दृष्टीचा नि प्रतिगामित्वाचा पुरस्कार आहे. हिंदुराष्ट्राची घोषणा ही मध्ययुगीन अर्थात् जुनाट असून तिचा उगम धार्मिक प्रवृत्तींत आहे. तसेच हिंदुराष्ट्रवाद हा मुस्लिम लीगच्या विचारप्रणालीची प्रतिक्रिया आहे, आणि त्यामुळेच तो असहिष्णु वृत्तीचा पुरावा आहे. हिंदुत्वाची विचारधारा ही निधर्मी शासनाच्या विचारप्रणालीशीं प्रतिकूल आहे। अशा प्रचारांत व्यक्तविली जाणारी विचारसरणी सत्य आहे असे गृहित धरण्यापूर्वी हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व निश्चित झाले पाहिजे. कारण ‘हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व तें हैं' असे जॉवर निःसंदिग्धपणे निश्चित झाले नाहीं तोवर आपणांस कोणत्याही राष्ट्रवादावर तो जातीय, अराष्ट्रीय वा प्रतिगामी असल्याचा आरोप ठेवता येणार नाही. कारण हिंदुस्थानांतील