Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ हिंदु राष्ट्रवाद मते वरील (त्याने या वाक्यापूर्वी दिलेली) माहिती निदान एका अपसमजाचे निराकरण करील. तो अपसमज असाः ‘बुद्ध हा हिंदुधर्माचा शत्रू। असून, विश्वासघात, अत्याचार, नि असमानता यांनी बुजबुजलेल्या समाजघटनेचा त्याने नाश केला. त्याच्या ह्या कर्तृत्वाचे भारतीयांवर ऋण आहे. पण वस्तुस्थिति तशी नाहीं. बुद्धाचा जन्म जसा हिंदु म्हणूनच झाला, तसाच त्याचा विकास झाला तोहि हिंदु म्हणूनच. थोडक्यांत तो हिंदु म्हणून जगला नि हिंदू म्हणूनच मृत्यु पावला......आणि तो जरी अत्यंत निष्ठावान बौद्धधर्मीय होता तरीही, त्याचा निर्देश बौद्ध सांप्रदायिक हिंदु असा करणे हेच रास्त ठरेल, गौतमाच्या पारमार्थिक किंवा आध्यात्मिक विचारांमध्ये असें कांहीं एक नवीन नव्हते, कीं जें जुन्या ह्या वा त्या दर्शनांत आढळणार नाही. त्याची नीतितत्वें प्राचीन अथवा पौराणिक ग्रंथांतूनच वेचलेली होती,......पुरातन संप्रदायांतच बौद्ध संप्रदायाचा उद्भव झाला. हिंदुधर्म नीच नि आक्रमक आहे हैं। दर्शविण्याऐवजी त्याने नेमके त्याच्या उलट सिद्ध केले. बौद्धसांप्रदायांत कमनीय नी उदात्त असे बरेच आहे याविषयी कोणाचेही दुमत नाही. आणि बौद्धधर्म तर हिंदुधर्माचेंच फळ होता. किंबहुना हिंदुधर्म हा बौद्धसांप्रदायाच्या पितृस्थानी होता. पुरातन धर्माच्या चैतन्याचे आपण यथातथ्य उद्गाते आहोत, असा बुद्धाचा स्वतःविषय समज असावा, आणि म्हणूनच त्याचेविषयीं असें निःसंशय म्हणता येईल की, हिंदुसमाजांतील सर्वश्रेष्ठ, बुद्धिमंत नि गुणवंत असाच तो हिंद होता. आतां शिख समाज हा हिंदुत्वांत कसा अंतर्भूत होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर शिखांची हिंदुधर्माकडे पाहण्याची दृष्टि हा होय. सावरकरांनी आपल्या ‘हिंदुत्व’ ग्रंथांत शिखांच्या धर्मगुरूंची वचनें उद्धृत केली आहेत. गुरु तेगबहादुर म्हणतो, ‘‘उत्तर भनयो धर्म हम हिंदु. तर गुरु गोविंदसिंह म्हणतो ‘‘जगे धर्म हिंदु, सकल भंड भाजे.’ शिख संप्रदायावरील आपल्या