९२ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व प्रबंधांत डॉ. गोकुळचंद नारंग' म्हणतात, ‘‘इस्लामी धर्मापासून शिख धर्मार्ने एकही तत्त्व स्वीकारलेले नाही. हा सिद्धांत माझ्याप्रमाणेच इतरही अनेक युरोपीय विद्वानांना मान्य आहे. त्यांच्यापैकी टंप म्हणतो, ‘नानकाने हिंदु आणि मुसलमानांच्या ईश्वरविषयक कल्पनांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला होता हा समज अगदी चूक आहे नानकाची सर्व मते पाहतां तो सर्वस्वी हिंदूच राहिला. नारंग पुढे लिहितात, ‘शिखधर्म हा इस्लामी तत्वज्ञानाचा जराही ऋणी नाही; किंबहुना तो हिंदुधर्माच्या विकासाचे अभिनव स्वरूपच होता आणि म्हणूनच शिख धर्म नी हिंदुधर्म यांची प्रमुख अंगें यांत बरेच साम्य आहे. तेव्हां नेहरूंसारख्या व्यक्तीने ‘शिख संप्रदाय हा हिंदुमुस्लिम ऐक्याचा प्रयत्न होता’ असे जरी म्हटले तरी शिखांना हिंदु नी मुसलमान यांत हिंदुविषयाच ममत्व वाटतें हैं। इतिहाससिद्ध आहे. आणि गतवर्षी पाकिस्थानांतून हिंदुस्थानांत शिखांनी केलेल्या स्थानांतराने तें अधिकच सिद्ध होते. सरतेशेवटी हेही ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं, हिंदु निबंध हा शिख, जैन, ब्रह्मोसमाजी इत्यादि सर्वांना लागतो. उपरोक्त सर्व पुरावे बौद्धादि समाज हिंदु आहेत हे सिद्ध करण्यास समर्थ आहेत. अशारीतीने आपण हिंदुत्वाच्या कक्षेत कोण येऊ शकतो नी कोण नाही, याचा विचार करूण ह्या निर्णयास आलों कीं, हिंदुत्वाच्या कक्षेत बौद्ध, जैन, शिख इत्यादि जसे येतात तसे मुसलमान, खिश्चन, पारशी हे कांहीं येऊ शकत नाहीत. ही गोष्ट सिद्ध होत असूनही कांहीं लोक अजूनही अशी सूचना करतात की, हिंदूंनी ‘हिंदु' ह्या अभिधानाच्या व्याख्येचा निकष ‘निवासभूमि' एवढाच काय तो कल्पून मुसल१ डॉ. गोकुळचंद नारंगः ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिखिझम : अॅपेन्डिक्स, २; पृ. १२, १६ २ नेहरुः ग्लिप्सिस् ऑफ् वर्ल्ड हिस्टरि, पृ. ३२० हैं
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/101
Appearance