९० हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व स्थाने भिन्न आहेत, तशीच त्यांची कारणेही भिन्न आहेत. शिख काय, बौद्ध काय हे सारे भारतद्भूत संप्रदाय वैदिक संप्रदायाचे एका अर्थाने उपपंथच आहेत. त्यामुळे रूढि, संस्कृति, निबंध, भाषा, उपभाषा, ऐहिक व पारमार्थिक विचारांची मूलस्थाने ही सर्वच्या सर्व शीख, बौद्ध, जैन नि वैदिक यांना थोड्याफार प्रमाणांत समानच आहेत. उलट ख्रिस्ती, इस्लामी हे अ-भारतोद्भव असल्याने त्या त्या धर्मातील रूढि, परंपरा, संस्कृति आदि सर्व, ज्या ज्या स्थळी त्यांचा प्रादुर्भाव झाला, त्या त्या स्थानांतुन उचलली गेली आहेत. अशी धार्मिक विभिन्नता ही केवळ पारलौकिक गोष्टीविषयींच्या श्रद्धेपुरती मर्यादित न राहतां, ती रूढि, भाषा, संस्कृति यांमध्ये पण भिन्नता निर्माण करते. उदाहरणार्थ, जेव्हां एकादा मनुष्य हिंदूचा मुसलमान होतो तेव्हा त्याची शंकरावरील श्रद्धा उडून ती महंमदावर जडते एवढेच होत नाही, तर एका क्षणांत त्याच्याकडून रूढि, परंपरा, भाषा, आचारविचार, वेशभूषा इत्यादि सर्वच बदललें जाऊन तो एका समाजांतून दुस-या समाजांत फेकला जातो. थोडक्यांत डॉ. श्री. व्यं, केतकर' म्हणतात त्याप्रमाणे * इस्लामी उपदेशाचे ते शिष्य न बनतां, विदेशी संस्कृतीचे आग्रही बनतात, त्यांचे स्वरूपं विदेशी बनते. वरील पहिल्या शीखादि गटांत सांप्रदायिक भिन्नता ही सामाजिक भिन्नता निर्माण करत नाहीं; उलट मुस्लीमादि गट हा धार्मिक । भिन्नतेबरोबरच सामाजिक भिन्नताही निर्माण करतो; नि त्यामुळेच हिंदुत्वांत पहिला गट जितक्या त्वरेनें अंतर्भूत होतो तितक्याच त्वरेने दुसरी गट त्याच्याबाहेर फेकला जातो. बौद्ध, शिख हे, प्रचलित समजुतींप्रमाणे, ( इतर) हिंदूंहून जितके दूर आहेत असे वाटते तितके ते दूर नाहींत हैं। दाखविणारे पुढील उतारे मननीय वाटतील. बौद्ध संप्रदाय ह्या विषयावरील अधिकारी समजला गेलेला लेखक व्हिस डेव्हिस म्हणतो, ६ माझ्या १ ज्ञानकोश : खंड १, पृ. ३६६ ।। २ व्हिस डेव्हिस; बुद्धिझम् : पृ. ८३-८४-८५
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/99
Appearance