पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या बोर्डीकडे वर सांगितलेले शहरांची बंदरें, व त्यांसंबंधाच्या मिळकती यांची व्यवस्था असते. या वोर्डीची कामें व महत्व ही दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. या बोर्डीसही निवडणुकीचे तत्व लागू करण्यांत आले आहे. व्यापार व धंदे यांच्या हिताहिताचा संबंध या कामांत फार असलेमुळे तद्व्यवसायी लोकां- चे तर्फे या वोडांत सभासद असतात. चेवर ऑफ कॉमर्स, ट्रेड्स् असोसिएशन्, त्या त्या शहराचे मुलकी कामगार, तेथील म्युनिसिपालिटिचे चेअरमन अथवा प्रेसिडेंट व एंजिनिअर हे या बोर्डीत सभासद असतात. या वोडींचे ताव्यांत दिलेली इष्टेष्टही फार मोठी व किमतीची असते व त्याच प्रमाणाने त्यांचे अधिकारही असतात. नवीन गोद्या बांधणे, जुन्या दुरुस्त करणे, तसेंच धक्के बांधणे, दीपगृहें वांधणे, व समुद्रांत खुणेसाठी बोयरे टाकणे, ही व अशा त-हेची कामें वोर्डीकडे असतात. याप्रमाणे व्यापाराच्या सोयीसाठी व तो वृद्धिंगत होण्यासाठी या वोडाँस मोठी खर्चाची कामें करावी लागतात, व ह्मणूनच या बोर्डीस कर्ज काढण्याची परवानगी दिलेली आहे. कलकत्ता ट्रस्ट हे १८७० सालांत स्थापन झाले. त्याबद्दलचा कायदा दुरुस्त करून नवीन कायदा १८९० साली करण्यांत आला. या बोडोंत पंधरा सभासद असतात व त्यांपैकी आठ सभासद वर सांगितलेप्रमाणे व्यापारी मंड- ळीचे व मुनसिपालिटीचे तर्फे निवडलेले असतात. या पंधरा सभासदांशिवाय चेरमन व व्हाइस चेरमन असतात त्यांची नेमणूक सरकारांतून होते. सन १८८१-८२, १८९१-९२,१८९२-९३ साली या बेडर्डीचे जमा व खर्चाचे ठोकळ आंकडे दिले आहेत. जमा रु. १८८१-८२ २०९६७० १५९०२५० १८९१-९२ ३२२२६१० २२९७४१० १८९२-९३ ३०३०००० २८३०००० कर्ज व मिळकतीची किंमत खाली लिहिलेप्रमाणे होती. कर्ज मिळकत १८८१-८२ रु. ७९७८३. १८८१-८२ रु.१३४३३६१० १८९-९२ रु.११७५९३८० १८९१-९२ रु.२२८१७१४० १८९२-९३ रु.४०३७०००० गेल्या १० वर्षांत या बोर्डाने कामें केली आहेत त्यांत किडरपूर येथील गोदी हे मुख्य आहे. ह्या कामास रु. २८७६०००० खर्च झाले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट या बोर्डाची स्थापना सन १-७३ चे कायद्यावरून झाली खर्च रु.