पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८०) त्या वेळी मोदीबंदर, एलफिन्स्टन कंपनीची इप्टेट, व दुसरे लहान धके व बेसिन्स, या मिळकती त्या बोर्डाचे ताव्यांत आल्या व त्या वेळी कर्जाची रकम रु० २११७०७५० त्यांचेकडे आली. पहिल्याने त्या बोडीत १२ ट्रस्टी व एक चेरमन असे सरकारांतून नेमण्यांत येत असत; पुढे सन १८७९ साली बोडींचे संबंधाने नवीन कायदा झाला, त्याप्रमाणे ५ ट्रस्टींची नेमणूक चेंबर ऑफ कॉमर्सने करावी व वाकीचे पांच सभासद व चेरमन यांची नेमणूक सरकारांनी करावी व सभा- सदांपैकी ३ सभासद मुंबईचे राहणारे नेटिवांपैकी असावे असे ठरले. या पोर्ट ट्रस्टानें केलेली मोठी कामें ह्मणजे दोन गोद्या, प्रिन्सिस डाक व व्हिक्टोरिया डाक बांधल्या ही होत. पहिली गोदी सन १८७५ सालीं शाहाजादे प्रिन्स ऑफ वेल्स हे मुंबई शहरांत आल्या वेळी वांधण्यास सुरवात झाली व ती १८८० चे जानेवारीत पुरी झाली. या गोदीत पाण्याचे क्षेत्र ३० एकर आहे, व धक्याची लांबी ६९५० फूट आहे, ती बांधण्यास खर्च रु. ८७२७००० लागला. दुसरी गोदी १८८८ साली बांधून पुरी झाली व तीस राणी साहेबांचे जुबिलीचे संस्मरणार्थ “ व्हिक्टोरिया डाके " असें नांव देण्यांत आले. १८९१।९२ सालचे अखेरीपर्यंत या गोदीवर रु. ८५७४२६० खर्च झाला. ह्याशिवाय व्यापाराचे सोईसाठी दुसरी पुष्कळ कामें करण्यांत आली आहेत. या वोर्डास सन १८८१-८२ व सन १८९१-९२ व सन १८९२-९३ साली जमा व खर्च किती झाला त्याचा तपशील येणेप्रमाणे:- जमा. खर्च. सन १८८१-८२ रु.३६६०८०० रु.३०९८५९० १८९१-९२ रु. ४८१०३१० रु. ४६२३९६० "१८९२-९३ रु. ४५००००० रु.४६५०००० सन १८९२।९३ अखेर कर्ज रु. ४९३९०००० होतें. कराची बंदरासाठी बोर्डाची नेमणूक सन १८८० साली झाली. त्यांत पांच सभासद असत व प्रेसिडेंट कलेक्टर असे. पुढे सन १८८६ साली पूर्वीचें बोर्ड वदलून रंगूनचे नमुन्यावर पोर्टट्रस्ट स्थापन करण्यात आले. या वोर्डीत सभासद ९ असतात, पैकी ३ सभासद व चेरमन व व्हसचेअरमन हे सरकार नेमतात व कराची मुनसिपालिटी दोन व चेंबर ऑफ कामर्स दोन सभासद निव- डून देतात. गेले ५ वर्षांत नवीन धक्का बांधला आहे, जुना धक्का सुधारला आहे, व वंदरांत येण्याच्या वाटा खोलगट केल्या आहेत. या बंदराचा उत्तर हिंदुस्थानाशी आगगाडीने संबंध जुळल्याने तिकडील माल परदेशी जाण्यास मोठी सोय झाली आहे. 2